टीम इंडियापुढे अडचणींचा डोंगर!
By Admin | Updated: January 29, 2015 03:07 IST2015-01-29T03:07:12+5:302015-01-29T03:07:12+5:30
तिरंगी मालिकेत पर्थमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टीम इंडियापुढे अडचणींचा डोंगर!
सिडनी : तिरंगी मालिकेत पर्थमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढतीपूर्वी टीम इंडियाला गोलंदाजी व फलंदाजी विभागातील अडचणी दूर करण्याचे आव्हान आहे.
भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीच्या दौऱ्यानंतर येथे आलेला आहे. ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याची प्रचिती आली. या पराभवानंतर १ फेब्रुवारी रोजी तिरंगी मालिकेच्या खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्रता मिळविण्यासाठी भारतीय संघापुढे उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळविण्याचे लक्ष्य होते. भारतीय संघाने दोन दिवस विश्रांती घेतली आणि दोन दिवस सराव केला. भारतीय संघ व्यवस्थापनालाही मैदानात व मैदानाबाहेरील संतुलन साधण्यात यश मिळाले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घाम न गाळताही भारताला दोन गुणांची कमाई करता आली. आता शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या लढतीत विजय मिळविणाऱ्या संघाला रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
धोनीने वारंवार वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची गरज असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)