‘टीम इंडिया’चे कोलकातामध्ये आगमन
By Admin | Updated: November 12, 2014 00:39 IST2014-11-12T00:39:53+5:302014-11-12T00:39:53+5:30
चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी प्रभारी युवा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ कोलकाता येथे पोहोचला आह़े

‘टीम इंडिया’चे कोलकातामध्ये आगमन
कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध होणा:या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी प्रभारी युवा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ कोलकाता येथे पोहोचला आह़े चौथ्या लढतीतही भारतीय संघ विजयी अभियान कायम राखण्यासाठी उत्सुक असेल़
मालिकेतील हैदराबाद येथे झालेल्या तिस:या सामन्यात भारताने विजय मिळवून 5 सामन्यांच्या मालिकेत 3-क् अशी आघाडी घेऊन सिरीजवर आधीच कब्जा केला आह़े
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार विराट कोहली बुधवार्पयत येथे पोहोचेल, तर रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, विनयकुमार आणि केदार जाधव आपापल्या शहरांतून सामन्यासाठी येथे पोहोचतील़
सिरीजमधील अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात झालेल्या बदलानंतर या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आह़े दरम्यान, संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर मुंबईत संघनिवडीच्या प्रक्रियेनंतर कोलकाता येथे पोहोचले आहेत. दुसरीकडे, सलग तीन सामन्यांत पराभव झाल्यामुळे श्रीलंका संघात मोठे बदल झाले आहेत. त्यांनी कुमार संघकारा, धम्मिका प्रसाद, सूरज रणदिव आणि उपुल तरंगा यांना मायदेशी पाठविले आह़े या खेळाडूंऐवजी लाहिरू थिरीमाने, अजंता मेंडिस, दिनेश चंदिमल आणि शमिंडा इरंगा यांचा संघात समावेश करण्यात आला आह़े हे खेळाडू कोलंबोहून बुधवारी कोलकाता येथे पोहोचतील़ मालिकेतील चौथा सामना 13 व पाचवा सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळविला जाईल़ (वृत्तसंस्था)