वर्चस्व सिद्ध करणारी यजमानांची टशन

By Admin | Updated: March 17, 2015 23:55 IST2015-03-17T23:55:05+5:302015-03-17T23:55:05+5:30

आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघात वरचढ कोण ठरणार, हा औत्सुक्याचा होता. या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियावर केवळ एका विकेटने निसटता विजय मिळविला.

Tashan of proven hosts | वर्चस्व सिद्ध करणारी यजमानांची टशन

वर्चस्व सिद्ध करणारी यजमानांची टशन

विश्वचषक स्पर्धेच्या ‘अ’ गटात दोन्ही यजमान देशांचा समावेश असल्याने आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघात वरचढ कोण ठरणार, हा औत्सुक्याचा होता. या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियावर केवळ एका विकेटने निसटता विजय मिळविला. कमी धावसंख्येचा हा सामना न्यूझीलंडने जिंकला असला तरी मने जिंकली ती आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने. त्याने या सामन्यात भन्नाट गोलंदाजी करीत न्यूझीलंडच्या घशातून विजयाचा घास अक्षरश: काढून घेतल्यातच जमा होता, पण केन विलियम्सनने निर्णायक षट्कार ठोकत कसा-बसा हा घास पुन्हा गिळला. स्टार्कने कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत २८ धावा देत सहा गडी बाद केले.

Web Title: Tashan of proven hosts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.