तरुण-अश्विनी पराभूत
By Admin | Updated: August 26, 2014 03:03 IST2014-08-26T03:03:53+5:302014-08-26T03:03:53+5:30
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना पुढे चाल मिळाली आहे;

तरुण-अश्विनी पराभूत
कोपेनहेगन : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना पुढे चाल मिळाली आहे;मात्र तरुण कोणा आणि अश्विनी पोनप्पा यांना मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली़
ज्वाला आणि अश्विनी यांना पहिल्या फेरीत इंग्लंडच्या हिथर ओलिवर आणि केट रॉबर्ट शॉ यांच्याशी सामना करावा लागणार होता; मात्र या लढतीत पुढे चाल मिळाल्यामुळे भारतीय जोडी स्पर्धेच्या पुढच्या फेरीत पोहोचली़
ज्वाला आणि अश्विनी यांना दुसऱ्या फेरीत आता पाचवे मानांकनप्राप्त चीनच्या किंग तियान आणि युनलेई झाओ या जोडीचा सामना करावा लागणार आहे़ त्याआधी तरुण कोणा आणि अश्विनी या जोडीला मिश्र दुहेरीत डेन्मार्कच्या आंदेर्स क्रिस्टीयनसन आणि ज्युली हाउमन यांच्याकडून केवळ ४६ मिनिटांत २१-१६, २७-२५ अशा फरकाने मात खावी लागली़
भारतीय खेळाडूंनी या लढतीत चांगलाच संघर्ष केला़ दुसरा गेम जिंकूनही त्यांना सामना जिंकता आला नाही़ तरुण आणि पोनप्पा यांना ४१ गुण मिळविता आले़ प्रतिस्पर्धी ज्युली आणि आंदेर्स यांनी एकूण ४८ गुणांची कमाई करून सामना आपल्या नावे केला़ (वृत्तसंस्था)