इराणचे लक्ष्य उसळीचे

By Admin | Updated: June 25, 2014 02:08 IST2014-06-25T02:08:15+5:302014-06-25T02:08:15+5:30

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत एफ गटात इराण संघ बुधवारी बोस्नियाशी झुंजणार आह़े

Target Iran | इराणचे लक्ष्य उसळीचे

इराणचे लक्ष्य उसळीचे

>साल्वाडोर : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत एफ गटात इराण संघ बुधवारी बोस्नियाशी झुंजणार आह़े या लढतीत विजय मिळविल्यास इराणची बाद फेरीची आशा कायम राहणार आह़े मात्र बोस्नियाला स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभव स्वीकारल्यामुळे हा संघ स्पर्धेतून विजयी निरोप घेण्यासाठी प्रयत्नशील असेल़ 
वल्र्डकपच्या साखळी फेरीत इराणला नायजेरियाविरुद्धच्या पहिल्या लढतीत बरोबरीत समाधान मानावे लागले होते; मात्र दुस:या लढतीत त्यांना अर्जेटिनाकडून एका गोलने मात खावी लागली होती़ दुसरीकडे बोस्निया संघ आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झाला आह़े त्यामुळे हा संघ स्पर्धेच्या बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आह़े 
इराणला अंतिम 16 संघांत स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना बोस्निया संघाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावेच लागणार आह़े त्याचबरोबर अर्जेटिना विरुद्धच्या लढतीत नायजेरियाला एकही गुण मिळू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आह़े 
दुसरीकडे बोस्निया संघ पहिल्या लढतीत अर्जेटिनाकडून 1-2 असा पराभूत झाला होता, तर दुस:या लढतीत त्यांना नायजेरियाकडून 
क्-1ने मात खाण्याची नामुष्की ओढवली आह़े त्याचे संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आह़े त्यामुळे संघ या लढतीत विजय मिळवून गोड शेवट करण्यासाठी प्रयत्नशील असेल़ (वृत्तसंस्था)

Web Title: Target Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.