शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टीबाबत चर्चा निरर्थक : कोहली

By admin | Updated: November 25, 2015 00:00 IST

खेळपट्टीवरून होणारी चर्चा निरर्थक आणि डोक्याबाहेरची असल्याने मी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अशा चर्चेपासून स्वत:ला हेतुपुरस्सर दूर ठेवल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.

नागपूर : खेळपट्टीवरून होणारी चर्चा निरर्थक आणि डोक्याबाहेरची असल्याने मी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अशा चर्चेपासून स्वत:ला हेतुपुरस्सर दूर ठेवल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला,‘भारतात विकेटवरून इतके स्तोम का माजविले जाते हे कळायला मार्ग नाही. क्रिकेटला अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर उभय संघ खेळायला तयार नसतील तर ती बातमी होऊ शकते. पण माझा संघ खेळपट्टीच्या स्थितीवर चर्चा करीत नाही. ज्यांना करायची असेल त्यांनी खुशाल चर्चा करावी. खेळपट्टीच्या आधारे संघाची निवडही करीत नाही. पाच दिवसांच्या खेळात कोणत्या दिवशी पिचचे स्वरूप कसे असेल हे लक्षात घेत नाही.’जामठा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सामना सुरू होण्याआधी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे संकेत कोहलीने दिले. कसोटीत परिस्थितीनुसार दोन अष्टपैलू खेळाडू असावेत. त्यातील एक अष्टपैलू फिरकीपटू तसेच दुसरा वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू हवा. यामुळे संयोजन फिट बसते. पण मी मात्र संघातील संयोजनाचा खुलासा उद्याच करेन, असे कोहलीने हसून सांगितले.पाच वर्षांआधी द. आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमला याने याच मैदानावर २५३ धावा ठोकल्या होत्या. याविषयी विचारताच कोहली म्हणाला,‘ आम्ही कुठल्या एका खेळाडूला टार्गेट करणार नाही. एखाद्या मालिकेत विरोधी संघ कर्णधाराला टार्गेट करते कारण तो डावपेच आखतो. आम्ही देखील असे केले आहे. पण यावेळी करणार नाही. महत्त्वाचे खेळाडू मालिकेत धावा काढू शकले नाहीत, हे या मालिकेत स्पष्ट झाले.’ (क्रीडा प्रतिनिधी)वर्षभरात आॅफ स्पिनर रवींद्रन अश्विन यशस्वी ठरण्याचे कारण काय असे विचारताच कोहली म्हणाला, ‘तो बेसिक्सवर अधिक लक्ष देतो, खूप प्रयोग करीत नाही. लंकेत त्याने यशस्वी कामगिरी केली शिवाय सध्या सर्वाधिक प्रभावी मारा करीत आहे. तो ‘कॅरम बॉल’ अभावानेच टाकतो. अश्विन नैसर्गिक गोलंदाजीला चिकटून राहतो. चेंडू टाकतेवेळी ताकद लावत असल्याने ज्या खेळपट्टीवर इतर गोलंदाज संघर्ष करतात त्या खेळपट्टीवर देखील अश्विनचे चेंडू उसळी घेऊ शकतात.’