सोशल मीडियावरही मुंबई-पुण्याचीच चर्चा

By Admin | Updated: May 21, 2017 19:57 IST2017-05-21T19:57:42+5:302017-05-21T19:57:42+5:30

मुंबई आणि पुण्याच्या संघांमध्ये आयपीएलची अंतिम लढच रंगत असल्याने दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर जुगलबंदी रंगली आहे. आज सकाळपासूनच फेसबूक आणि व्हॉट्स अॅपवर

Talk about Mumbai-Pune only on social media | सोशल मीडियावरही मुंबई-पुण्याचीच चर्चा

सोशल मीडियावरही मुंबई-पुण्याचीच चर्चा

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 -  आयपीएल 10 चा महाअंतिम मुकाबला आता सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामाचे विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. मात्र यंदा मुंबई आणि पुण्याच्या संघांमध्ये आयपीएलची अंतिम लढच रंगत असल्याने दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर जुगलबंदी रंगली आहे. आज सकाळपासूनच फेसबूक आणि व्हॉट्स अॅपवर मुंबई आणि पुण्याचीच चर्चा आहे. त्यातून एकमेकांवर टीका टीप्पण्या, टोमणेबाजी सुरू आहे.  त्यातील काही निवडक नमुने खास तुमच्यासाठी.
  
- पुन्हा RPSG VS MI  
पुण्याला फक्त पुण्याचा सपोर्ट...
आणि मुंबई ला मुंबईचा सपोर्ट... 
पण कोणीही जिंकलं तरी नाव महाराष्ट्राचंच होणार याचा सार्थ अभिमान आहे!
 
-   पुन्हा मुंबई-पुणे-मुंबई!!!
कोणीही जिंकला तरी ट्रॉफी महाराष्ट्रातच!!!
 
-  पुणे-मुंबई फायनल मॅच टाय झाली तर
ट्रॉफी लोणावळ्याच्या घाटात ठेवणार...
 
- आज़ रात्रि 8.00 वाजता -
 दुपारी 1 ते 4 झोपणारे
विरुद्ध 
 रात्री 1 ते 4 झोपणारे   
 
- आजचा सामना :  आगे से राईट को वळो विरूद्ध वरच्या अंगाला आणि खालच्या अंगला 
 
- आता जर फायनल
 मध्ये जिंकू नाही दिलं 
तर आख्या पुणे जिल्ह्याचं Jio बंद   
 
- शिकावं तर मुंबई इंडियन्स कडून,
स्वतः पण Final ला  आली.. आणि पुणे बरोबर 3 वेळा हरून त्यांना  Final ला  येण्यास मदत केली...
याला म्हणत्यात भावकी कशी जपावी
 

Web Title: Talk about Mumbai-Pune only on social media