चॅरिटीविषयी बोलायचं, तर तुम्हीच आम्हाला 'कोहिनूर' देणं लागता - सेहवागचा इंग्रजांना टोला

By Admin | Updated: September 1, 2016 09:33 IST2016-09-01T09:09:15+5:302016-09-01T09:33:15+5:30

इंग्लंडने वर्ल्डकप जिंकायच्या आधी भारताने ऑलिम्पिकमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवून दाखवलं तर, मी दहा लाख रुपये समाजसेवेसाठी देईन.

To talk about charity, you have to give us 'Kohinoor' - British teammates | चॅरिटीविषयी बोलायचं, तर तुम्हीच आम्हाला 'कोहिनूर' देणं लागता - सेहवागचा इंग्रजांना टोला

चॅरिटीविषयी बोलायचं, तर तुम्हीच आम्हाला 'कोहिनूर' देणं लागता - सेहवागचा इंग्रजांना टोला

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १ - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी जिंकलेल्या पदकांवरून खिल्ली उडवण्याची इंग्लंडमधील पत्रकार पिअर्स मॉर्गनची खुमखुमी अजूनही जिरलेली नसून त्याने या मुद्यावरून पुन्हा भारतीयांना लक्ष्य करत टोमणा मारला आहे. मॉर्गनने ट्विटरवरून पुन्हा ऑलिम्पिक मेडल्सचा विषय कढत माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला डिवचत त्याला आव्हान दिले. 
 
'इंग्लंडने वर्ल्डकप जिंकायच्या आधी भारताने ऑलिम्पिकमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवून दाखवलं तर, मी दहा लाख रुपये समाजसेवेसाठी देईन, सेहवाग तुला हे आव्हान मान्य आहे?' असे ट्विट त्याने केले. 
 
 
 
 
त्यावर सेहवागनेही त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले. 
' मॉर्गन, भारताकडे आधीच नऊ सुवर्णपदकं आहेत, (पण) इंग्लंडकडे एकही वर्ल्डकप नाही.  आणि चॅरिटीविषयीच बोलायचं झालं तर,  तुम्हीच (इंग्रज) आम्हाला "कोहिनूर" देणं लागता' असे ट्विट करत सेहवागने त्याला सुनावले. 
 
 
इंग्लंडने वर्ल्डकप जिंकायच्या आधी भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दाखवावं, मी दहा लाख रुपये समाजसेवेसाठी देईन असे टि्वट केले. भारताने यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्याची माहिती न घेता  मॉर्गनने हे टि्वट केलं होते. मॉर्गनच्या या खोडसाळपणामुळे संतापलेल्या नेटीझन्सही त्याला टार्गेट करत टोला मारला. या टि्वटची सोशल मिडियावर खिल्ली उडवल्यानंतर हे प्रकरण आपल्यावरच उलटताना दिसल्यावर मॉर्गनने आधीचे ट्विट डिलीट करून दुसरे ट्विट टाकले.
 
 
 
मात्र त्याची ही चलाखी नेटीझन्स आणि सेहवाग दोघांच्याही लक्षात आली आणि त्यांनी त्याला पुन्हा सुनावले.
 
 
पत्रकार पियर्स मॉर्गननेच या टि्वटर वॉरची सुरुवात केली होती. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवल्यानंतर सुरु असलेल्या जल्लोषावर त्याने टीका केली होती. त्यावर सेहवगाने मॉर्गनला इंग्लंडला आतापर्यंत एकही वर्ल्‍डकप जिंकता आला नसल्याची आठवण करुन दिली. 
 
 

Web Title: To talk about charity, you have to give us 'Kohinoor' - British teammates