लैला हुसैनीला भीती तालिबान्यांची !

By Admin | Updated: September 19, 2014 02:14 IST2014-09-19T02:14:05+5:302014-09-19T02:14:05+5:30

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी लादलेली महिलांवरील कडक बंधने झुगारून लैला हुसैनी ही 28 वर्षीय तरुणी तायक्वांदोमध्ये स्वत:चे अस्तित्व शोधते आहे

Taliban fear Laila Hussein! | लैला हुसैनीला भीती तालिबान्यांची !

लैला हुसैनीला भीती तालिबान्यांची !

काबूल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी लादलेली महिलांवरील कडक बंधने झुगारून लैला हुसैनी ही 28 वर्षीय तरुणी तायक्वांदोमध्ये स्वत:चे अस्तित्व शोधते आहे. 2क्1क्च्या दक्षिण आशियाई स्पध्रेत रौप्यपदक पटकावून तिने यशही मिळविले. या खेळात तिला अनेक शिखरे पार करायची आहेत, पण तिला भीती आहे तालिबानी र्निबधांची, आणि त्यामुळे येणा-या समस्यांची..
अफगाणिस्तान तालिबान्यांचे बंड मोडून काढण्यासाठी अमेरिकी फौजांनी तिथे मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम या वर्षअखेरीस संपुष्टात येईल आणि फौजा माघारी परततील. पण, त्यानंतर पुन्हा एकदा तालिबानी डोके वर काढतील आणि त्यांचे कडक र्निबध लागू होतील. त्यामुळे पहिला बळी जाईल ती महिलांच्या स्वातंत्र्याचा. त्यामुळे तिच्या क्रीडाप्रेमाचे काय होणार, अशी भीती हुसैनीला वाटते. गेल्या 13 वर्षात संथ गतीने का होईना, महिला स्वातंत्र्याविषयी झालेल्या जागृती पुन्हा मावळतीला लागेल, या भीतीने तिची झोपही उडाली आहे. 
तालिबान्यांनी पुन्हा रूढीवादी फतवे काढले तर केवळ माझीच नाही, तर येथील सर्व स्त्रियांची चिंता वाढेल. तालिबानी 
आम्हाला नेहमी दडपणाखाली ठेवतील आणि आतार्पयत कर्तृत्वाने मिळवलेला मान हरवेल, याची चिंता वाटते, असेही हुसैनी म्हणते. 
येथे केवळ तालिबानीच नव्हे तर काही पुराणमतवादी कुटुंबातूनही मुलींनी क्रीडा क्षेत्रत सहभाग घ्यावा याला त्यांचा विरोध आहे. माङया काका-काकीनेही तायक्वॉँदो खेळण्याच्या माङया निर्णयाला विरोध केला होता. मात्र, माङया पहिल्या अजिंक्यपद स्पध्रेतील पदकानंतर त्यांचा विरोध मावळला. माङया कुटुंबाने मला नेहमीच पाठिंबा दिला, असेही हुसैनी सांगते. 
 

 

Web Title: Taliban fear Laila Hussein!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.