टेबल टेनिस

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:43+5:302015-07-12T23:56:43+5:30

अनन्या, आदी, अर्पिता, सर्वेशला जेतेपद

Table tennis | टेबल टेनिस

टेबल टेनिस

न्या, आदी, अर्पिता, सर्वेशला जेतेपद
जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
नागपूर: शिवाजीनगर क्लबच्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कॅडेट मुलींच्या गटात अनन्या सकलकल्लेे, मुलांमध्ये आदी चिटणीस आणि सबज्युनिअर मुलीमध्ये अर्पिता सप्रे, सर्वेश पाटीलने विजेतेपद पटकाविले.
जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि डॉ. आंबेडकर कॉलेज स्पोर्ट्स अकादमीच्या सहकार्याने दीक्षाभूमी येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कॅडेट मुलींच्या गटातील अंतिम लढतीत अनन्या सकलकल्लेेने मयूरी देशमुखला ११-७, ११-९, ११-८ ने नमविले. कॅडेट मुलांमध्ये आदी चिटणीसने काव्य रामटेकेला ११-९, ६-११, ११-६, १३-११ ने पराभूत केले.
सबज्युनिअर मुलींच्या गटात अर्पिता सप्रेने दिशा गिरधरला ११-८, ११-८, ९-११, ६-११, १२-१० ने नमविले. मुलांच्या अंतिम सामन्यात सर्वेश पाटीलने वेदांत टेंभरेला ११-८, ११-३, ११-६ ने धक्का दिला.
पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत देवदत्त फडणवीस व उज्ज्वल वाणी या जोडीने देवेंद्र देवघरे व अजय कांबळे या जोडीला ८-११, ११-५, ११-९ ने पराभूत केले. ज्युनिअर मुलींच्या उपांत्य सामन्यात कादंबरी भांडारकरने हरिती चव्हाणला ११-७, ११-६, ११-३, ११-६ ने आणि अनन्या सकलकल्ले हिने दिशा गिरधरला ८-११, ११-५, १२-१४, ११-४, ११-१, ११-५ ने पराभूत करून अंतिम फेरी गाठली.(क्रीडा प्रतिनिधी)
...........................

Web Title: Table tennis