टी २० विश्वचषक, पाकिस्तानचा बांगलादेशसमोर २०१ धावांचा डोंगर
By Admin | Updated: March 16, 2016 16:59 IST2016-03-16T16:55:33+5:302016-03-16T16:59:06+5:30
शेहजाद अहमद, शाहिद आफ्रिदी आणि माहमद्द हाफिज यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावार पाकिस्तानने बांगलादेशसमोर निर्धारीत २० षटकात २०१ धावांचा डोंगर उभा केला

टी २० विश्वचषक, पाकिस्तानचा बांगलादेशसमोर २०१ धावांचा डोंगर
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १६ - शेहजाद अहमद, शाहिद आफ्रिदी आणि माहमद्द हाफिज यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावार पाकिस्तानने बांगलादेशसमोर निर्धारीत २० षटकात २०१ धावांचा डोंगर उभा केला. बांगलादेशला विजयासाठी २० षटकात २०२ धावांची गरज आहे. पाकिस्तान संघाने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शेहजाद अहमद (५२), शाहिद आफ्रिदी(४९) आणि माहमद्द हाफिज (६४) यांच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज सुरवात केली. शाहिद आफ्रिदीने १९ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकाराच्या मदतीने ४९ धावा करत पुन्हा एकदा आपली जादू दाखवली.
टी-२० पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून मुख्य स्पर्धेत प्रवेश घेतलेल्या बांगलदेशचा संघ चांगल्या लयीमध्ये आहे. सलामीवीर तमीम इक्बालने अखेरच्या पात्रता लढतीत ओमानविरुद्ध शतक तडकावले असल्याने त्याच्यावरच संघाची मुख्य मदार असेल. अष्टपैलू शाकिब अल हसनचा अनुभवही बांगलादेशसाठी निर्णायक ठरेल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा शाकिब ईडन गार्डनची खेळपट्टी चांगली ओळखून असल्याने त्याचा फायदा तो बांगलादेशला नक्कीच करून देईल.
ईडन गार्डन येथे होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशविरुद्ध आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल. तर, पाकिस्तानविरुद्ध जिंकल्याचा आत्मविश्वास घेऊन बांगलादेश पुन्हा एकदा धक्का देण्यास सज्ज आहे.