टी-२० सामना: भारत २ बाद ७३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 14:54 IST2016-01-26T14:37:33+5:302016-01-26T14:54:51+5:30
धवन व रोहित शर्मा एकामागोग बाद झाल्यानंतर कोहलीने भारताचा डाव सावरला असून ८.३ षटकांत भारताने ७३ धावा केल्या आहेत.

टी-२० सामना: भारत २ बाद ७३
ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. २६ - एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिला टी-२० सामना खेळणा-या भारताने ८.३ षटकांत भारताने ७३ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (३१) पाठोपाठ शिखर धवनही (५) बाद झाल्याने कोहलीने (१६) भारताचा डाव सावरला असून सध्या त्याच्या साथीला सुरेश रैना (१५) आहे. ऑस्ट्रेलियातर्फे शेन वॉटसनने दोन्ही बळी टिपले.
तीन सामन्यांच्या या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याची आशा असलेल्या भारतीय संघाची मदार कोहली व रैनावर आहे.