फराह खान यांच्या हस्ते टी शर्टचे अनावरण

By Admin | Updated: September 25, 2016 05:16 IST2016-09-25T05:16:26+5:302016-09-25T05:16:26+5:30

प्रख्यात दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनी शनिवारी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनच्या टी शर्टचे अनावरण केले. ‘वॉव’ या संस्थेच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद

T-shirt unveiled by Farah Khan | फराह खान यांच्या हस्ते टी शर्टचे अनावरण

फराह खान यांच्या हस्ते टी शर्टचे अनावरण

औरंगाबाद : प्रख्यात दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनी शनिवारी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनच्या टी शर्टचे अनावरण केले. ‘वॉव’ या संस्थेच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे आलेल्या फराह खान यांनी आज दर्डा निवास येथे भेट दिली.
११ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. फराह यांनी ‘आय रन फॉर मायसेल्फ’ (स्वत:साठी पळा) या लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनच्या मुख्य संकल्पनेवर आपल्या पसंतीची मोहोर दर्शवली. फराह खान व रुचिरा दर्डा यांनी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉन टी शर्टचे अनावरण केले. ५ कि. मी., १0 कि. मी. आणि २१ कि. मी. अंतराच्या या शर्यतीत भाग घेवू इच्छिणाऱ्यांनी mycitymarathon.comया संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. मॅरेथॉनप्रेमींना facebook.com/AurngabadMarathon हे पेज लाईक करून स्पर्धेची माहिती घेता येईल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: T-shirt unveiled by Farah Khan