मेलबर्न : आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धा वेळेचा अपव्यय असून, या स्पर्धेला गंभीरपणे घेण्यासाठी या प्रकारचे अधिक सामने खेळवणे गरजेचे आहे, असे वैयक्तिक मत आॅस्टे्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज रेयान हॅरिस याने व्यक्त केले. भारताने आॅस्टे्रलियाला व्हाइट वॉश दिल्यानंतर एक दिवसाने हॅरिसने आपले मत व्यक्त करताना सांगितले, की प्रत्येक संघ नियमित क्रिकेटच्या तुलनेत टी-२० सामने कमी खेळत असताना, या टी-२० विश्वचषक स्पर्धा व्यर्थ आहे.गतवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या हॅरिसने एका रेडिओला मुलाखत देताना सांगितले, की टी-२० विश्वचषक स्पर्धा वेळेचा अपव्यय असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. गतवर्षी आम्ही एक टी-२० सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता, तर यंदा टी-२० विश्वचषक असल्याने आम्ही सहा सामने खेळलो. शिवाय भारताकडे रवाना होण्यापूर्वीही द. आफ्रिकेविरुद्ध ३ सामने खेळणार आहोत.
टी- २० विश्वचषक म्हणजे वेळेचा अपव्यय : हॅरिस
By admin | Updated: February 2, 2016 03:17 IST