शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 02:34 IST

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी ...

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी न्यूझीलंडला ३-० ने नमवून शेवट गोड केला.

नवनीत कौरने ४५ आणि ५८ व्या मिनिटाला, तर शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला गोल केले. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. नवनीतने ४५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. नवनीतने सामना संपायला दोन मिनिटे असताना पुन्हा एकदा हल्ला चढविला. त्यात तिला यश आले.

भारताने दौºयातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघावर ४-० असा विजय नोंदविला होता. त्यानंतरच्या सामन्यात न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाकडून मात्र १-२ तसेच ०-१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. मंगळवारी चौथ्या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर १-० ने विजय नोंदविला. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी मायदेशी परतणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत