मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 19:00 IST2025-09-05T18:56:52+5:302025-09-05T19:00:32+5:30

नेमकं कुठं अन् काय घडलं? जाणून घ्या  त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

Swarm of Bees Stop Football Match in Tanzania Football Players Officials Lie Flat on the Ground to Avoid Being Stung Watch Video | मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)

मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)

टांझानिया बाबाती येथील मैदानात रंगलेल्या प्री सेशन फुटबॉल सामन्यात मधमाशांमुळे सामना थांबवण्याची वेळ आली. सामना चालू असताना अचानक मैदानात घोंगावणाऱ्या मधमाशांमुळे एकच गोंधळ उडाला. मैदानातील खेळाडू, पंच आणि कॅमरा क्रू मेंबर्संनी मधमाशांच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी  कसरत करावी लागली. फुटबॉलच्या मैदानात अचानक घडलेल्या प्रसंगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. नेमकं कुठं अन् काय घडलं? जाणून घ्या  त्यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोणत्य़ा फुटबॉल मॅचमध्ये घडली ही घटना?

प्री फुटबॉल से नायजेरियाचा सिटी एफसी अबुजा आणि झांझीबारच्या JKU एफसी यांच्यातील सामना बाबाती येथील क्वारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. दोन्ही संघांतील सामना १-१ असा बरोबरीत असताना ७८ व्या मिनिटाला मधमाशांनी मैदानात घोंगावण्यास सुरुवात केली.  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सामना काही वेळासाठी स्थगित करण्याची नामुष्की ओढावली. खेळाडूंसह मैदानातील रेफ्रींनी मैदानातच झोपून मधमाशांना चकवा देण्याचा फंडा आजमावला.

आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

व्हिडिओ सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

खेळाडू, पंच आणि स्टाप सदस्यांसह सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्येही या गोष्टीमुळे गोंधळ उडाला. मैदानातील खेळाडूंची अवस्था पाहून स्टेडियममध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याचेही पाहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही खेळाडू किंवा स्टेडियममधील उपस्थितीत प्रेक्षकांपैकी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा सामना सुरु झाला. या घटनेचा व्हिडिो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Web Title: Swarm of Bees Stop Football Match in Tanzania Football Players Officials Lie Flat on the Ground to Avoid Being Stung Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.