स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
By Admin | Updated: August 23, 2014 22:31 IST2014-08-23T22:31:50+5:302014-08-23T22:31:50+5:30
महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा जाहीर

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
म ाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा जाहीरनांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठतर्फे नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यांतर्गत असणार्या महाविद्यालयांच्या २०१४-१५ मध्ये होणार्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.२७ ऑगस्टपासून क्रॉसकंट्रीने स्पर्धेस सुरुवात होणार असून, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचा शेवट तलवारबाजीने १० जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक याप्रमाणे-२७ ऑगस्ट क्रॉसकंट्री (वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर), जलतरण १,२ सप्टेंबर (सहयोग बी. एड. कॉलेज नांदेड), मल्लखांब ६, ७ सप्टेंबर (बीपीएड महाविद्यालय कौठा), खो-खो ९, १० सप्टेंबर (के. के. एम. महाविद्यालय मानवत), बेसबॉल १२, १३ सप्टेंबर (दयानंद विज्ञान लातूर), व्हॉलीबॉल-कबड्डी १५, १६ सप्टेंबर (दयानंद कॉमर्स लातूर), हँडबॉल १८, १९ सप्टेंबर (महात्मा फुले महाविद्यालय मुखेड), टेबल टेनिस, बॅडमिंटन २०, २१ सप्टेंबर (के. के. एम. महाविद्यालय मानवत), क्रिकेट (पुरुष) २३ ते २५ सप्टेंबर (दयानंद कला महाविद्यालय लातूर), बॉस्केटबॉल २७, २८ सप्टेंबर (शाहू महाविद्यालय लातूर), सॉफ्टबॉल ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर (दयानंद कॉमर्स लातूर).फुटबॉल ६ ते ८ ऑक्टोबर (महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा), बुद्धिबळ व कुस्ती १०, ११ ऑक्टोबर (शाहू महाविद्यालय लातूर), मैदानी स्पर्धा १३, १४ ऑक्टोबर (स्वारातीम विद्यापीठ नांदेड), शरीरसौष्ठव व भारतोलन १६, १७ ऑक्टोबर (विधि महाविद्यालय नांदेड), योगा २७, २८ ऑक्टोबर (इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड), बॉल बॅडमिंटन व तायक्वाँदो ३०, ३१ ऑक्टोबर (विवेकानंद महाविद्यालय शिरुर ताजबंद), बॉक्सिंग, ज्युदो १, २ नोव्हेंबर (ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी), क्रिकेट (महिला) ७, ८ नोव्हेंबर (पीपल्स महाविद्यालय नांदेड), टेनिस ९, १० नोव्हेंबर (दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर), हॉकी २, ३ जानेवारी २०१५ (आदर्श महाविद्यालय हिंगोली), नेटबॉल ६, ७ जानेवारी (महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर), तलवारबाजी ९, १० जानेवारी (बी. रघुनाथ महाविद्यालय परभणी) (क्रीडा प्रतिनिधी)