‘सुपरमॅन’ सुआरेज.!
By Admin | Updated: June 21, 2014 01:00 IST2014-06-21T01:00:54+5:302014-06-21T01:00:54+5:30
गत लढतीत डग आऊटमध्ये बसून उरुग्वेचा पराभव पाहणा:या लुईस सुआरेजने इंग्लंडविरुद्ध ‘सुपर’ कामगिरी केली.

‘सुपरमॅन’ सुआरेज.!
>इंग्लंडचा जीव टांगणीला :
उरुग्वेचा 2-1 असा धमाकेदार विजय
साऊ पाउलो : गत लढतीत डग आऊटमध्ये बसून उरुग्वेचा पराभव पाहणा:या लुईस सुआरेजने इंग्लंडविरुद्ध ‘सुपर’ कामगिरी केली. सुआरेजने या लढतीत दोन गोल करीत उरुग्वेला फिफा विश्वचषक स्पध्रेत पहिल्या विजयाची चव चाखवली. उरुग्वेने ही लढत 2-1 अशा फरकाने जिंकली.
फुटबॉलमधील यशापयश इंच व सेंटीमीटरमध्ये मोजले जाते, याचा प्रत्यय इंग्लंडचा स्टार स्ट्राइकर वेन रुनी याला आला. उरुग्वेविरुद्धच्या करो किंवा मरो सामन्यात 9 व्या मिनिटालाच इंग्लंडला फ्री किक मिळाली, पण रुनीचा अंदाज चुकला अन् सामन्यात आघाडी घेण्याची इंग्लंडची संधी हुकली!
3क्व्या मिनिटीला स्टीव्हन जेरार्डने रुनीला अप्रतिम पास दिला, पण रुनीचा हेडर क्रॉसबारवर लागला. इंग्लंडची उरुग्वेविरुद्ध आघाडी घ्यायची आणखी एक संधी हुकली़ सा:या फुटबॉल जगताचे लक्ष दुखापतीतून पुनरागमन करणा:या लुईस सुआरेजवर लागले होते. 39व्या मिनिटाला उरुग्वेच्या कवानीने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना चकवत सुआरेजला एक उत्कृष्ट पास दिला. कवानीच्या या पासवर सुआरेजने हेडरद्वारा गोल साकारला आणि उरुग्वेला 1-क् आघाडी मिळवून दिली.
53व्या मिनिटाला लेटन बेन्स याने रुनीला पेनल्टी किक जागेत पास दिला. पण सहा यार्डावरून गोल करण्यास रुनी चुकला. उत्तरार्धात इंग्लंडने उरुग्वेवर या सामन्यात जोरदार आक्र मण केल़े अखेर त्यांना नशिबाची साथ मिळाली़ 75व्या मिनिटाला रुनीने इंग्लंडला 1-1 अशी बरोबरी आणून दिली. इंग्लंडचा चपळ बचावपटू गॅरी कॅहलीने आजच्या सामन्यात इंग्लंडला अनेक वेळा तारले.
स्टीव्हन जेरार्डची चूक उरु ग्वेच्या पथ्यावर
सलामीच्या लढतीत इटलीने 2-1ने इंग्लंडला पराभूत केले होत़े विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील दुस:या साखळी सामन्यात कप्तान स्टीव्हन जेरार्डच्या चुकीमुळे इंग्लंडची उरु ग्वेविरुद्ध साधता येणारी बरोबरी थोडक्यात हुकली़ स्टीव्हन जेरार्डच्या कारकिर्दीतील हा सर्वात दुर्दैवी क्षण असेल. असा प्रसंग कुणाच्या जीवनात येऊ नये, पण सुआरेझ आणि उरु ग्वेसाठी तो क्षण मोलाचा ठरला आणि उरु ग्वेचा इंग्लंडवर विजय सुनिश्चित झाला़