सुपर किंग्ज ‘चॅम्पियन्स’
By Admin | Updated: October 5, 2014 01:35 IST2014-10-05T01:35:58+5:302014-10-05T01:35:58+5:30
स्पध्रेत अपराजित राहिलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या अंतिम फेरीत पराभवाने आलिंगन दिले.

सुपर किंग्ज ‘चॅम्पियन्स’
>बंगळुर : स्पध्रेत अपराजित राहिलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला चॅम्पियन्स लीग टी-2क् च्या अंतिम फेरीत पराभवाने आलिंगन दिले. कोलकाताला 18क् धावांचा डोंगर उभा करूनही सुरेश रैनाच्या आतषबाजीसमोर गुडघे टेकण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्जने ही लढत अवघ्या 18.2 षटकांत 2 बाद 185 धावांचा पल्ला गाठून जिंकत आपणच चॅम्पियन्स असल्याचे दाखवून दिले.
कोलकाताने अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्जसमोर 18क् धावांचा डोंगर उभा केला. नाणोफेक जिंकून चेन्नईने पहिल्यांदा या स्पध्रेत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गेल्या चार लढतीत त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 3 विजय साजरे केले असूनही चेन्नईचा हा निर्णय कोलकातासाठी समाधानकारक होता. या आमंत्रणाचा आत्मविश्वासाने स्वीकार करणा:या कोलकाताने धडाकेबाज सुरुवात केली. रॉबीन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी चेन्नईच्या अभेद्य मा:याचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी 9च्या सरासरीने चेन्नईवर प्रहार सुरूच ठेवला आणि अवघ्या 1क् षटकांत 9क् धावांचा पल्ला पार करून दिला. अकराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पवन नेगीच्या गोलंदाजीवर उथप्पा यष्टिचीत झाला. त्यानंतर आलेल्या कॅलिसलाही नेगीने आशिष नेहराकरवी झेलबाद केले.
गंभीरने मनीष पांडेसह तिस:या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान गंभीरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. 17व्या षटकात रवींद्र जडेजाने 52 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 8क् धावा चोपणा:या गंभीरला माघारी धाडले. त्यानंतर नेगीने कोलकाताच्या फलंदाजांना तंबूत पाठवण्याचा धडाका लावला आणि कोलकाताला निर्धारित 2क् षटकांत 6 बाद 18क् धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. नेगीने 5 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
नाइट रायडर्स : उथप्पा यष्टिचीत धोनी गो. नेगी 39, गंभीर झे. मॅक्युलम गो. जडेजा 8क्, कॅलिस झे. नेहरा गो. नेगी 1, पांडे झे. मॅक्युलम गो. नेगी 32, पठाण नाबाद 2क्, रॉन टेन डोएचॅट यष्टिचीत धोनी गो. नेगी क्, यादव झे. नेहरा गो. नेगी क्, रसेल नाबाद 2. अवांतर - 6 ; एकूण - 6 बाद 18क् धावा. गोलंदाजी - नेहरा 4-क्-54-क्, शर्मा 3-क्-27-क्, अश्विन 3-क्-26-क्, नेगी 4-क्-22-5, जडेजा 4-क्-25-1, ब्रावो 2-क्-24-क्. चेन्नई सुपर किंग्ज : स्मिथ त्रि. गो. क्युमिन्स 8, मॅक्युलम झे. डोएचॅट गो. पठाण 39, रैना नाबाद 1क्9, धोनी नाबाद 23. अवांतर - 6; एकूण - 2 बाद 185 धावा. गोलंदाजी - क्युमिन्स 3-क्-32-1, कुलदीप 4-क्-44-क्, पठाण 3.3-9-34-1.
सुरेश रैनाने 62 चेंडूंत 8 षटकारांची व 6 चौकारांची आतषबाजी करून नाबाद 1क्9 धावा ठोकल्या. चॅम्पियन्स लीग टी-2क् मध्ये शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला, तर दोन जेतेपद पटकावणारा चेन्नईही एकमेव संघ आहे. कोलकाताचा निम्मा संघ गार करणा:या गोलंदाज पवन नेगीला सामनावीरच्या किताबाने गौरविण्यात आले, तर मालिकावीरचा किताब सुरेश रैनाने पटकावला.
रैनाची फटकेबाजी
18क् धावांचा पाठलाग करताना बॅ्रण्डम मॅक्युलम आणि सुरेश रैना यांनी मुक्तपणो फलंदाजी केली. मॅक्युलमने 3क् चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 39 धावांची संयमी खेळी करून रैनासह दुस:या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. मॅक्युलम बाद झाल्यानंतर रैनाने सूत्रे आपल्या हाती घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रैनाने टी-2क् मधील तिसरे शतक पूर्ण करून चेन्नईचा विजय पक्का केला.