शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
3
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
4
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
5
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
6
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
7
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
8
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
9
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
10
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
11
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
12
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
13
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
14
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
15
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
16
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
17
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
18
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
19
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
20
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'

सुखमनी टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र होऊ शकतो - अभिजित दळवी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 11:26 PM

राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

शिवाजी गोरेपुणे : राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याच्याबरोबर जेम्सन सिंग व अतुल वर्मा हे होते. त्याने महाराष्ट्राला या स्पर्धेत पहिले रौप्यपदक जिंकून दिले असल्याचे सहमार्गदर्शक नेवासा (अहमदनगर) येथील अभिजित दळवी यांनी ‘लोकमत’ला राजोरियो येथून सांगितले.दळवी म्हणाले, की स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जेव्हा मी आणि संघाचे मुख्य मार्गदर्शक मीम बहादूर संघातील खेळाडूंबरोबर चर्चा करीत होतो, त्या वेळी अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीत सराव करीत असलेल्या सुखमनीच्या डोळ्यांमध्ये आम्ही एक वेगळाच आत्मविश्वास पाहिला. गेली १५ वर्षे राज्य आर्चरी संघटनेचा मार्गदर्शक म्हणून काम पाहताना जेव्हा जेव्हा सुखमनीला मी मैदानावर लक्ष्य साधताना पाहिले, तेव्हा एवढा आत्मविश्वास कधीच पाहिला नाही. ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात आपले लक्ष्य साधताना तो आज वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याच्याकडून लक्ष्य चुकले तरी तो गालातल्या गालात हसून आमच्याकडे पाहत होता. वैयक्तिक प्रकारातही तो टॉप ८ मधून बाहेर पडला आहे. कोरियाविरुद्धच्या खेळाडूबरोबर तो एक स्पर्धा जिंकला असता तर तो वैयक्तिकमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला असता. पात्रता फेरीमध्येसुद्धा नेत्रदीपक कामगिरी केली होती. तो सध्या त्याच्या गटात महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून मानला जातो. महासंघालासुद्धा त्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. आता भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता आमचे परतीचे विमान आहे. भारतात पोहोचल्यानंतर आम्ही सर्व हरियाणामध्ये रोहतक येथील किंवा झारखंडमध्ये जमशेटपूरमधील टाटा आर्चरी अ‍ॅकॅडमीमध्ये भारतीय संघाचे शिबिर २०१८मध्ये जकार्ता येथे होणाºया आशियाई स्पर्धेच्या दृष्टीने लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे सुखमनीसुद्धा तेथेच राहणार आहे. परदेशी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण एकदा सुरू झाले की, त्याच्या कामगिरीत अजून खूप सुधारणा होईल.आमच्याबरोबर किशोरी गटात दौंडची (जि. पुणे) साक्षी शितोळेसुद्धा भारतीय संघात होती. तिचीसुद्धा कामगिरी नेत्रदीपक झाली; पण तिला पदक जिंकण्यात अपयश आले. सुखमनीला २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीनेसुद्धा सराव शिबिरात दाखल करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. जर त्याची त्या शिबिरासाठी निवड झाली तर तो टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा नक्कीच फडकावेल. - अभिजित दळवी, सहमार्गदर्शक