सुर्शुत सेव्हिअर्स, चरक विजयी
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:31+5:302014-12-02T23:30:31+5:30
निमा प्रिमियर लीग: इम्तियाज शेख, विद्या शेंडगे सामनावीर

सुर्शुत सेव्हिअर्स, चरक विजयी
न मा प्रिमियर लीग: इम्तियाज शेख, विद्या शेंडगे सामनावीरसोलापूर: सोलापुरातील बीएएमएस डॉक्टरांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर निमा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील पुरुष कनिष्ठ गटात सुर्शुत सेव्हिअर्स तर महिला गटात चरक महिला संघ विजयी झाल़ेपहिल्या सामन्यात वॉग्भट वॉरिअर्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 6 बाद 66 धावा केल्या़ यात डॉ़ विजय चौगुले 25 तर डॉ़ मंगेश बिराजदार यांनी 12 धावा केल्या़ सुर्शुत सेव्हिअर्सकडून डॉ़ इम्तियाज शेख 2 तर डॉ़ आसिफ शेख व डॉ़ प्रणीत बरले यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला़ प्रत्युत्तरात सुर्शुत सेव्हिअर्सने 61 धावांचे लक्ष्य 6़3 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल़े यात डॉ़ इम्तियाज शेख नाबाद 20 तर डॉ़ सतीश दाभाडे यांनी 13 धावा केल्या़ वॉग्भट वॉरिअर्सकडून डॉ़ फिरोज मुलाणी व डॉ़ रविराज पवार यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला़ हा सामना सुर्शुत सेव्हिअर्सने आठ गडी राखून जिंकला़ अष्टपैलू कामगिरीबद्दल डॉ़ इम्तियाज शेख यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़ेदुसर्या महिलांच्या सामन्यात सुर्शुत महिला संघाने 10 षटकात 3 बाद 52 धावा केल्या़ यात डॉ़ श्वेता बोबडे 14 तर डॉ़ शर्वरी अयाचित यांनी 13 धावा केल्या़ चरक संघाकडून डॉ़ विद्या शेंडगे यांनी 3 षटकात 13 धावा देताना तीन बळी घेतल़े प्रत्युत्तरात चरक महिला संघाने 53 धावांचे लक्ष्य 8़1 षटकात पूर्ण केल़े यात डॉ़ विद्या शेंडगे 17, डॉ़ प्रतिभा टेकडे यांच्या 15 धावांचा समावेश आह़े सुर्शुतकडून डॉ़ ऐश्वर्या फडे यांनी एक बळी घेतला़ हा सामना चरक महिला संघाने सात गडी राखून जिंकला़ अष्टपैलू डॉ़ विद्या शेंडगे यांना सामनावीरने सन्मानित करण्यात आल़े (क्रीडा प्रतिनिधी)0000000000000000 कनिष्ठ गटातील पहिल्या सामन्यात सुर्शुत सेव्हिअर्सने वॉग्भट वॉरिअर्स संघावर आठ गडी राखून विजय मिळवला़ महिलांच्या दुसर्या सामन्यात चरक संघाने सुर्शुत महिला संघावर सात गड्यांनी विजय मिळवला़9999999999999999999999सुर्शुत सेव्हिअर्स संघातील अष्टपैलू खेळाडू डॉ़ इम्तियाज शेख यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करताना डॉ़ शिवशरण खोबऱे0000000000000000000000सोलापुरातील बीएएमएस डॉक्टरांसाठी आयोजित निमा प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सुर्शुत सेव्हिअर्स आणि वॉग्भट वॉरिअर्स संघातील खेळाडू़