स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश

By सचिन सागरे | Updated: September 13, 2022 18:50 IST2022-09-13T18:47:55+5:302022-09-13T18:50:04+5:30

शिमला येथे आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटिंगपटूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक अशी ११ पदके पटकावली.

success of skaters of dombivli in skating competition | स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश

स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : शिमला येथे आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटिंगपटूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक अशी ११ पदके पटकावली.

कुफरी येथे रोलर स्केटिंग अकॅडमी आणि ए. के. रोलर शिमला (हिमाचल प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी ऑल इंडिया स्केटिंग स्पर्धा १० आणि ११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी आठ राज्यातून सुमारे दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डोंबिवलीतील ३ ते १२ वयोगटातील १८ मुलामुलींचा सहभाग होता. त्यातील ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक पटकावले. स्पर्धेमधील पदक विजेत्या खेळाडूंमध्ये शौर्य म्हात्रे, लायरा सोनस, इवाण चावडा, मुकुल यादव, स्वराज वझे, वरूण उपाध्ये, नक्ष गुंगरी, मायरा चोडलकर, हर्षित आणि मुरणमय यांचा समवेश आहे.

Web Title: success of skaters of dombivli in skating competition