शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत सहिनेचे यश
By Admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:25+5:302014-08-22T23:32:25+5:30
सोलापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सकुबाई हिराचंद नेमचंद (सहिने) प्रशालेने चुरशीच्या सामन्यात र्शाविका कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकावल़े

शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत सहिनेचे यश
स लापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सकुबाई हिराचंद नेमचंद (सहिने) प्रशालेने चुरशीच्या सामन्यात र्शाविका कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद पटकावल़ेसहिने प्रशालेने अंतिम सामन्यात र्शाविका महाविद्यालयावर 25-29, 29-22, 29-21 ने मात करीत विजयावर शिक्कामोर्तब केला़सहिनेकडून भावना बुधाराम, कांचन बुधाराम, ज्ञानेश्वरी देशमुख, ममता परदेशी, प्राजक्ता शहापूरकर, दीपाली गुंड, नेहा मोरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल़े र्शाविकाकडून वैष्णवी महांकाळ, शिवानी होमकर, रेवती वाघमारे यांनी सुरेख खेळ केला़या स्पर्धेत मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले असून, नगर येथील विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आह़ेत्यांना क्रीडाशिक्षक मुकुंद गिरी, वीरेश अंगडी, प्रशिक्षक अविराज गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्थाध्यक्ष मोहन दाते, कार्यवाह अँड़ रघुनाथ दामले, मुख्याध्यापक धनंजय जोशी, उपमुख्याध्यापिका पद्मा माशाळ, पर्यवेक्षक मधुरा गोगटे यांनी कौतुक केल़ेफो टोओळी-शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत यश मिळविलेल्या सहिने प्रशालेच्या संघासोबत मधुरा गोगटे, मुकुंद गिरी, धनंजय जोशी, अँड़ रघुनाथ दामले, पद्मा माशाळ, वीरेश अंगडी, अविराज गायकवाड़