सुआरेझने घेतला संघ अन् स्वत:च्या संधीला ‘चावा’

By Admin | Updated: June 26, 2014 02:20 IST2014-06-26T02:20:03+5:302014-06-26T02:20:03+5:30

उरुग्वेच्या पहिल्या सामन्यावेळी गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या स्टार खेळाडू सुआरेझने इंग्लडविरुध्द सामन्यात दोन गोल करत वादळ निर्माण केले.

Suarez took the team and 'Chava' on its own. | सुआरेझने घेतला संघ अन् स्वत:च्या संधीला ‘चावा’

सुआरेझने घेतला संघ अन् स्वत:च्या संधीला ‘चावा’

>विनय नायडू - 
उरुग्वेच्या पहिल्या सामन्यावेळी गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या स्टार खेळाडू सुआरेझने इंग्लडविरुध्द सामन्यात दोन गोल करत वादळ निर्माण केले. 2क्14 च्या स्पर्धेतील ‘संस्मरणीय खेळाडू’ ठरण्याच्या मार्गावर असतानाच त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याचे नाव बदनाम झाले.
बलाढय़ इटलीला घरचा रस्ता दाखणा:या उरुग्वे व सुआरेझ दोघांनही जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले.193क् नंतर विश्वचषक जिंकण्याच्या आशा असणा:या ऊरुग्वेच्या कामगिरीला मात्र सुआरेझच्या कृत्यामुळे गालबोट लागले.सुआरेझने प्रतिस्पर्धी खेळाडूचा चावा घेतल्यामुळे आपले भवितव्य व संघाची संधी धोक्यात घातली आहे. या प्रकारामुळे 1997 मध्ये जगप्रसिद्ध मुष्टीयोध्दा माईक टायसनने याने इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावा घेतल्याच्या घटनेच्या आठवणी जागृत केल्या. सुआरेझविरुद्धच्या कारवाईस प्रारंभ झाला असून इटलीच्या जॉर्जिओ चिलीनी याचे दुखापत दाखवातानाचे छायाचित्र त्याला शिक्षा करण्यासाठी पुरेसे आहे. या कृत्यानंतरही पंचांनी त्याला मैदानावर राहू दिल्याबद्दल इटलीच्या खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते.सुआरेझने असे कृत्य का केले याचा उलगडा मात्र काही केल्या होत नाही. या कृत्यामागे त्याच्या बालपणातील संगोपणावरही काही जणांनी बोट ठेवले आहे. मात्र दहा लाख डॉलर पगार असणा:या व्यक्तीकडून असे कृत्य होते यावर विश्वास ठेवणो कठीण आहे. फिफा त्याच्यावर 24 सामने किंवा दोन वर्षाची बंदी घालू शकते. दोन मुले असणारा सुआरेझ ऊरुग्वेमधील अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याने काही काळ कार पार्किगमध्ये आसरा घेतला होता.इंग्लडविरुद्ध दोन गोल केल्यांनंतर त्याने संघाचे फिजीओ वॉल्टर फेरेइरा यांच्याकडे बोट करत त्यांना आलिंगण दिले होते. 63 वर्षाच्या फेरेइरा यांनी सुआरेझला गुडघेदुखीतून बाहेर काढण्यासाठी आपली कर्करोगावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. खरेच, सुआरेझसाठी त्यांनी जे काही केले ते व्यर्थ गेले.
 

Web Title: Suarez took the team and 'Chava' on its own.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.