सुआरेजवरील बंदी ‘कठोर’च!
By Admin | Updated: June 28, 2014 01:19 IST2014-06-28T01:19:17+5:302014-06-28T01:19:17+5:30
उरुग्वेचा स्टार स्ट्राईकर सुआरेज लुईसवर घातलेल्या बंदीचा निर्णय कठोरच आहे, असे मत इटलीचा डिफेंडर जॉजिर्यो चिलीनीने व्यक्त केले आहे.

सुआरेजवरील बंदी ‘कठोर’च!
>जॉजिर्यो चिलीनीची अशीही खंत
साल्वाडोर : उरुग्वेचा स्टार स्ट्राईकर सुआरेज लुईसवर घातलेल्या बंदीचा निर्णय कठोरच आहे, असे मत इटलीचा डिफेंडर जॉजिर्यो चिलीनीने व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, मैदानावर घडलेल्या या घटनेमुळे माङया मनात सुआरेजबद्दल कोणत्याही दु:खद भावना नाहीत. त्याची ही कृती सामन्यातील आक्रमकता आणि नैराश्यतेपोटी होती. दरम्यान, या कृत्यामुळे फिफाने सुआरेजवर 9 सामन्यांची बंदी घातली. या बंदीमुळे तो आता लिव्हरपूल प्रीमियर, चॅम्पियन लीग तसेच 2क्16 र्पयत देशातील मैत्रीपूर्ण सामन्यातही सहभागी होऊ शकणार नाही.