हरभजनच्या खोचक टीकेला स्टिव्ह स्मिथचं प्रत्युत्तर

By Admin | Updated: February 22, 2017 19:11 IST2017-02-22T19:11:00+5:302017-02-22T19:11:00+5:30

ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून पुण्यात सुरूवात

Steve Smith's reply to Harbhajan's knockout criticism | हरभजनच्या खोचक टीकेला स्टिव्ह स्मिथचं प्रत्युत्तर

हरभजनच्या खोचक टीकेला स्टिव्ह स्मिथचं प्रत्युत्तर

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून पुण्यात सुरूवात होत आहे. त्यापुर्वी दोन्ही संघातील माजी खेळाडूंच्या विधानामुळे वातावरण चांगलंच गरम झालं आहे. फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाच्या संघावर खोचक टीका केली होती त्याला ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथने उत्तर दिलं आहे.  
 
भारत दौ-यावर आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ 4-0 ने मालिकेत हारेल असं भज्जी म्हणाला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने चांगला खेळ केला तर ते 3-0 ने हारतील अशी खोचक टीका हरभजनने केली होती.  हरभजनच्या या टीकेवर स्मिथला आज विचारण्यात आलं त्यावर त्याने हरभजनचं वक्तव्य खोडून काढलं. 'ही मालिका आमच्यासाठी खडतर असेल यामध्ये शंका नाही. भारताने गेल्या काही दिवसांमध्ये खूप चांगला खेळ केला आहे, विशेषत: घरच्या मैदानांवर भारताचा खेळ जास्तच चांगला होतो. पण भारताला टक्कर देण्याची क्षमता आमच्या संघात आहे. या मालिकेसाठी आम्ही अंडरडॉग आहोत. त्यामुळे हरभजनसारखे आम्ही 4-0 ने हारू अशी विधानं करतात, पण आम्हाला तसं वाटत नाही. आम्ही भारताला योग्य टक्कर देऊ' असं स्मिथ म्हणाला.

Web Title: Steve Smith's reply to Harbhajan's knockout criticism