राज्य वूडबॉल स्पर्धा
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:04+5:302015-01-29T23:17:04+5:30
राज्य शालेय वूडबॉल स्पर्धा सुरू

राज्य वूडबॉल स्पर्धा
र ज्य शालेय वूडबॉल स्पर्धा सुरूनागपूर : राज्य शालेय आणि सहाव्या कनिष्ठ गट राज्य वूडबॉल स्पर्धेला गुरुवारी रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर शानदार सुरुवात झाली. शालेय गटात मुलामुलींचे आठ विभागांचे संघ सहभागी झाले आहेत. कनिष्ठ गटाच्या स्पर्धेत २२ जिल्हा संघांमधील मुले आणि मुली यांचा सहभाग आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्याहस्ते सायंकाळी झाले. यावेळी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ क्रीडा संघटक गिरीश गदगे, वृडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव अजय सोनटक्के, कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर, जिल्हा वूडबॉल संघटनेचे सचिव डॉ. यशवंत पाटील, सचिव सुधीर कहाते, डॉ. सूरज येवतीकर, डॉ. कल्पना जाधव यांची उपस्थिती होती. प्रास्तविक राज्य संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर बागडे यांनी केले.दीप प्रज्वलनानंतर हवेत फुगे सोडून स्पर्धा सुरू झाल्याची पाहुण्यांनी घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राकेश तिवारी यांनी केले.(क्रीडा प्रतिनिधी)