शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शिर्डीत पार पडल्या अंध मुलांच्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:15 IST

स्पर्धेतून निवडले जाणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) आयोजित सोनी पिक्चर नेटवर्क इंडिया  यांच्या सौजन्याने नुकतीच मुलांची अंध मुलांची शालेय राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आत्म मालिक क्रिकेट अकादमी, कोपरगाव शिर्डी येथे ११ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान या स्पर्धा घेण्यात आल्या.

या प्रसंगी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र च्या अधिकाऱ्यांसोबत आत्म मलिक शाळेचे मुख्याधापक श्री. डांगे उपस्थित होते. अंध क्रिकेटमध्ये चांगले भविष्य आहे. तसेच या मुलांना भविष्यात सचिन तेंडूलकरला भेटायची इच्छा आहे असे या पर्संगी बोलताना आपल्या भावना वक्त केल्या. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकण अश्या सहा विभागातील १०० अंध मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या स्पर्धेतून निवडले जाणारे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या तसेच अशा स्पर्धेतून या मुलांना या वयातच उत्तम प्रशिक्षण देऊन पुढल्या काळात त्यांचा खेळाला चालना देणे हाच आहे.

तीन दिवस खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चाळीसगाव आणि जालना हा पहिला सामना रंगला यात चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी केली आणि सामना २१ धावांनी जिंकला. दिसर्या सामना पंढरपूर आणि जालना या संघात झाली यात पंढरपूर संघाने नाणेफेक जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंढरपूर संघाचे  अवघ्या १२ धावत सगळे गाडी बाद केले आणि सामना सहज जिंकाला. तिसरा सामना चिखलदरा आणि कोरेगाव संघात झाला यात चिखलदरा संघाने नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी केली पण या वेळी किरेगाव संघाने १२ धावांनी सामना जिकून घेतला. पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना अहमदाबाद आणि बोधादी या संघात रंगला रोमांच पूर्ण अश्या या सामन्यात अहमदाबादस संघाने १०५ धावांचे आव्हान फक्त २ गडी बाद करून ठेवले. पण यावर बोधादी संघाने १० षटकात पाच गडी बाद १०३ धावा पूर्ण करत सामना जिकला यामुळे त्यांचावर कौतुकांचा वर्षाव झाला.

दुसर्या दिवशी पहिला सामना बोधादी आणि चिखलदरा संघात झाला या वेळी चिखलदरा संघाने सामना जिंकताना बोधादी संघाला फक्त १०षटकांत ९ गाडी बाद ४७ धावा करयाला देवून सहज जिंकून घेतला. दुसरा सामना कोरेगाव विरुद्ध अहमदाबाद अस झाला यात अहमदाबाद संघाने गोलंदाजी करतांना १०षटकांत ६ गाडी बाद ६८ धावा करयाला देऊन जिंकला. तिसर्या सामन्यात चाळीसगाव संघाने १५५ धावांचे तगडे आव्हान पंढरपूर संघासमोर ठेवले. पण पंढरपूर संघ मात्र ३७ धावाच करू शकले आणि चाळीसगाव संघाने सामना जिंकला. चौथ्या सामन्यात बोधादी विरुद्ध कोरेगाव संघात झाला यात कोरगाव संघाने सामना जिकून आपले सेमीफायनल मधील स्थान पक्के केले. तर पाचच्या सामन्यात चिखलदरा संघाने सहजपणे अहमदाबाद हरवत सेमीफायनल मध्ये आपला प्रवेश केला.

तिसर्या दिव दोन सेमीफायनल आणि एक अंतिम सामना होणार होत्या यात पहिला सामना चिखलदरा विरुद्ध चाळीसगाव तर दुसरा सामना कोरगाव विरुद्ध जालना होणार होता. पहिल्या सामन्यात चिखलदरा संघाने चाळीसगाव संघावर मात करत अंतिम सामन्यात मजल मारली. तसेच कोरेगाव संघाने जालना संघावर मत करत सामना जिकला. त्यामुळे या स्पर्धेची अंतिम लढत हि चिखलदरा विरुद्ध कोरेगाव आशय उत्तम संघात होणार होती त्यामुळे अश्या नाट्यमय सामन्याला पाहण्यासाठी आत्म मलिक शाळेचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याची उत्स्तुकता या वेळी दिसून येते होती कारण पहिल्यांदाच अश्या प्रकारचे अंध क्रिकेट ते पाहत होते. चिखलदरा संघाने हा सामना जिकून आपल्या आपल्या मागील वर्षाच्या विजयची पुरानावृती केली .

स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी प्रसंगी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र च्या अधिकाऱ्यांसोबत आत्म मालिक शाळेचे क्रीडा विभागाचे मुख्य श्री, भट्ट या वेळी उपस्थित होते. या वेळी प्रत्येक संघाला रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी भट्ट सरांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र च्या अधिकार्यांना अशा अनेक सामन्याचे आयोजन करण्याचे आवाहन केले आणि त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे घोषित केले.

टॅग्स :shirdiशिर्डी