हॉक्स, प्रताप, डीसीसी संघांची आगेकूच राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा
By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:21+5:302014-09-13T22:59:21+5:30
सांगोला : गुरुवर्य कै.च़वि़तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या हॉक्स, अकलूजचा प्रताप क्रीडा मंडळ, सोलापूरचा डीसीसी, पुण्याच्या बीएनएस संघांनी आगेकूच केली़

हॉक्स, प्रताप, डीसीसी संघांची आगेकूच राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा
स ंगोला : गुरुवर्य कै.च़वि़तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या हॉक्स, अकलूजचा प्रताप क्रीडा मंडळ, सोलापूरचा डीसीसी, पुण्याच्या बीएनएस संघांनी आगेकूच केली़आज झालेल्या सामन्यात पुण्याच्या हॉक्स संघाने सांगोला तालुका बास्केटबॉल संघाचा 51-56 अशा गुणांनी पराभव केला़ तसेच अकलूजच्या प्रताप क्रीडा मंडळाने अहमदनगरच्या एबीसी संघावर 51-40 ने,सोलापूरच्या डीसीसीने सोलापूरच्याच सहारा संघावर 60-51 ने, पुण्याच्या हॉक्स बास्केटबॉल संघाने सातारा येथील लिजेंड संघावर 51-30 ने, सोलापूरच्या एलकेपी संघाने पुण्याच्या बीएनएसवर 43-36 ने, तर सोलापूरच्या शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या संघाने सातार्याच्या डीजी कॉलेजवर 29-11 गुणांनी मात केली़ अत्यंत चुरशीच्या सामन्यात जळगावच्या पायोनिअर क्लब व पुण्याच्या मॉडर्न कॉलेज संघातील लढतीत मॉडर्न कॉलेजने 23-22 गुणांनी विजय मिळवला़या स्पर्धेत राज्यातील 40 संघांनी भाग घेतला आह़ेया स्पर्धेचे उद्घाटन आयएएस अधिकारी गंगाधरन यांच्या हस्ते झाल़े यावेळी तहसीलदार र्शीकांत पाटील, पोलीस निरीक्षक अजय कदम, नगराध्यक्ष नवनाथ पवार, संस्थाध्यक्ष पी़सी़ झपके आदी उपस्थित होत़े