राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांना प्रारंभ
By Admin | Updated: November 22, 2014 23:29 IST2014-11-22T23:29:52+5:302014-11-22T23:29:52+5:30
यजमान महाराष्ट्राची पराभवाने सुरुवात

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांना प्रारंभ
य मान महाराष्ट्राची पराभवाने सुरुवात नाशिक : जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आयोजित केलेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेस आज उत्साहात प्रारंभ झाला़ उद्घाटनाच्या सामन्यातच पराभव पत्कारावा लागल्याने यजमान महाराष्ट्राची खराब सुरुवात झाली़ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष रमेश शानबाग व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले़ महाराष्ट्राची कप्तान सुधीक्षा नायर हिने खेळाडूंना शपथ दिली़ प्रारंभी खेळाडूंचे शानदार संचालन झाले. याप्रसंगी राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनचे संचालक कालार्ेस बोराटा, नगरसेवक संजय साबळे, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष परवेज पिरजादे, जाकीर सय्यद, समीर घोडके, राष्ट्रीय खेळाडू सुधीर माने, भारतीय बास्केटबॉल संघटनेचे मुकुट मेडी, शफिक शेख, राजेश पटेल, अशोक रंगीन,नंदिनी बसपा, रवि नायर आदि उपस्थित होते. उद्घाटनानंतर झालेल्या महाराष्ट्र विरु द्ध तामिळनाडू या मुलांच्या गटातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात तामिळनाडू संघाने अखेर ( ९७ - ८४ ) गुण मिळवून विजय संपादन केला, तर निकराची झुंज देऊनही यजमान महाराष्ट्राच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला तत्पूर्वी सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांचे निकाल खालीलप्रमाणे मुली : आसाम विजयी विरु द्ध बिहार (३९-१९), तेलंगाना विजयी विरु द्ध राजस्थान (५० - ३१),गोवा विजयी विरु द्ध झारखंड (२३- १७), ओरिसा विजयी विरु द्ध उत्तरखंड (४१ - २५), केरळ विजयी विरु द्ध कर्नाटक (२७ - ४९), प. बंगाल विजयी विरु द्ध मणिपूर (५० - ९)़मुले - आसाम विजयी विरु द्ध बिहार (६५-५६), उत्तराखंड विजयी विरु द्ध त्रिपुरा (६५ - २९), छत्तीसगढ विजयी विरु द्ध आंध्र प्रदेश (७५ - ५७), ओरिसा विजयी विरु द्ध उत्तर प्रदेश (६६ - ५८), मध्य प्रदेश विजयी विरु द्ध राजस्थान (६० - ४०), कर्नाटक विजयी विरु द्ध मिझोराम (४५ - ३४), तेलंगाना विजयी विरु द्ध जम्मू-काश्मीर (४५ - १२) प.बंगाल विजयी विरु द्ध दिल्ली (८० - ७४), पंजाब विजयी विरु द्ध गोवा (६० - १८)फोटो- क्ऱ22 पीएचएनओ 159, 160फोटो ओळी - १़ महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू संघातील चुरशीचा क्षण २़ राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना डावीकडून संजय साबळे, परवेज पिरजादे, रमेश शानबाग, नंदिनी बसपा,सुधीर माने, कालार्ेस बोराटा़