तारांकित ‘वऱ्हाड’ येणार अर्जेंटिनाला

By Admin | Updated: June 30, 2017 00:46 IST2017-06-30T00:46:00+5:302017-06-30T00:46:00+5:30

बार्सिलोना एफसीचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या लग्नाची सध्या क्रीडाविश्वात मोठी चर्चा असून या लग्नसोहळ्यासाठी क्रीडा

Starred 'Warhad' to come to Argentina | तारांकित ‘वऱ्हाड’ येणार अर्जेंटिनाला

तारांकित ‘वऱ्हाड’ येणार अर्जेंटिनाला

रोसारियो : बार्सिलोना एफसीचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या लग्नाची सध्या क्रीडाविश्वात मोठी चर्चा असून या लग्नसोहळ्यासाठी क्रीडा आणि सिनेमा जगतातील तारे अर्जेंटिनामध्ये एकत्र येतील. मेस्सी आपली बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जो हिच्याशी ३० जूनला विवाहबद्ध होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या शानदार विवाह सोहळ्यासाठी पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक यांचाही २६० पाहुण्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. गेरार्ड मेस्सीसह बार्सिलोना संघातून खेळतो. याशिवाय लुईस सुआरेज, नेमार यांसारखे स्टार फुटबॉलपटूदेखील या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. रोसारियो या मेस्सीच्या मूळ शहरातील एका कॅसीनोमध्ये या विवाहाचा शानदार सोहळा पार पडेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Starred 'Warhad' to come to Argentina