शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

स्टार क्रिकेटपटूंची गोव्यात आजपासून लढत

By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST

टी-२० स्पर्धा: एमसीसी, आर्लेम, चिखली व जीसीए मैदानावर सामने

टी-२० स्पर्धा: एमसीसी, आर्लेम, चिखली व जीसीए मैदानावर सामने
पणजी : ऑईस अँड नॅचरल गॅस कापोर्रेशन (ओएनजीसी) ने आयोजित केलेली पेट्रोलियम स्पोट्र्स प्रोमोशन बोर्ड (पीएसपीबी) चे अंतर्गत युनिट आणि ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोट्र्स प्रोमोशन बोर्ड (एआयपीएसएसपीबी) ची टी-२० क्रिकेट स्पर्धा आज (दि. २९) पासून गोव्यात विविध ठिकाणी सुरू होत आहे. प्रथमच ही स्पर्धा गोव्यात होत असून, ती दि. ११ मार्चपयंर्त चालणार आहे. या स्पर्धेत देशभरातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळणार असल्याची माहिती ओएनजीसीचे गौतम वढेरा यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.
या परिषदेस गोवा क्रिकेट संघटनेचे विनोद फडके, समीर काणेकर, ओएनजीसी संघाचा प्रशिक्षक साईराज बहुतुले, भारतीय पेट्रोलियम संघाचा प्रशिक्षक मंदार फडके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
वढेरा म्हणाले की, या स्पर्धेत रणजी खेळाडूंसह राष्ट्रीय संघातून खेळलेले खेळाडू विविध संघांतून खेळणार आहेत.दररोज चार सामने होतील. दोन्ही गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील आणि अंतिम सामना जीसीएच्या मैदानावर होईल. जीसीएचे मैदान, एमसीसी (मडगाव), आर्लेम या मैदानावर पीएसपीबीचे सामने दि. २९ ते ५ मार्च रोजी होतील, तर एआयपीएसएसपीबीचे सामने दि. ६ ते ११ मार्चपयंर्त जीसीए मैदान, एमसीसी, आर्लेम आणि चिखली मैदानावर सामने होतील. या स्पर्धा आयोजनासाठी जीसीएने संपूर्ण सहकार्य केल्याचे वढेरा यांनी सांगितले.

ईशांत, अमित, प्रवीण, प्रज्ञान यांचा सहभाग
ईशांत शर्मा, अमित मिश्रा, प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, मनीष पांड्ये, वासिम जाफर, अजय रात्रा, संदीप सिंग, अमित भंडारी, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, श्रेयस गोपा, प्रज्ञान ओझा, आदित्य तरे, बलविंदर संधू, रमेश पोवार, त्याचबरोबर १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळलेले अरमान जाफर, अवेश खान या खेळाडूंचा प्रामुख्याने सहभाग आहे.