डोक्याला चेंडू लागून श्रीलंकेचा सलामीवीर कौशल सिल्वा जखमी
By Admin | Updated: April 25, 2016 10:11 IST2016-04-25T10:11:51+5:302016-04-25T10:11:51+5:30
श्रीलंकन सलामीवीर कौशल सिल्वाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू डोक्याला लागून तो जखमी झाला.

डोक्याला चेंडू लागून श्रीलंकेचा सलामीवीर कौशल सिल्वा जखमी
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २५ - श्रीलंकन सलामीवीर कौशल सिल्वाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू डोक्याला लागून तो जखमी झाला. रविवारी देशातंर्गत क्रिकेट स्पर्धे दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना ही घटना घडली. कौशल सिल्वा कसोटीमध्ये श्रीलंकन सलामीवीराची भूमिका पार पाडतो.
पालेकेले येथे क्षेत्ररक्षण करत असताना सिल्वाच्या डोक्याला चेंडू लागला. त्याचे प्राथमिक स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आले आहेत, पण कोलंबोमधील रुग्णालयात त्याच्यावर पुढीच चाचण्या करण्यात येणार आहेत असे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने सांगितले. आतापर्यंत श्रीलंकेसाठी २४ कसोटी सामने खेळणा-या सिल्वाने ३१ च्या सरासरीने १४०४ धावा केल्या आहेत.
फलंदाजाजवळ शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना कौशलला चेंडू लागला. सिल्वाने यावेळी हेल्मेट घातले होते त्यामुळे मोठा मार टळला. सिल्वाने विशेष डिझाईन केलेले हेल्मेट घातले होते. ऑस्ट्रेलियन फलंदाज फिलीप ह्युजेसच्या मृत्यूनंतर खेळाडूंच्या अतिरिक्त सुरक्षेसाठी अशी विशेष हेल्मेट बनवण्यात आली आहेत. नोव्हेंबर २०१४ डोक्याला चेंडू लागून फिलीपचा मृत्यू झाला होता.