‘मॅच फिक्सिंग’च्या संशयावरून श्रीलंकेच्या अधिकाऱ्याची चौकशी
By Admin | Updated: October 11, 2015 23:47 IST2015-10-11T23:47:43+5:302015-10-11T23:47:43+5:30
आयसीसीने श्रीलंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘मॅच फिक्सिंग’मध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून चौकशी सुरू केली आहे.

‘मॅच फिक्सिंग’च्या संशयावरून श्रीलंकेच्या अधिकाऱ्याची चौकशी
कोलंबो : आयसीसीने श्रीलंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘मॅच फिक्सिंग’मध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून चौकशी सुरू केली आहे. स्थानिक क्रीडा संस्थेने याबाबतची माहिती दिली.
एसएलसीचे सचिव प्रकाश शाफ्टर म्हणाले की, गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे क्युरेटर जयानंद वर्नावीरा यांची चौकशी आयसीसी भ्रष्टाचारविरोधी पथक करत आहे. प्रकाश म्हणाले की, गेल्या अठवड्यात एसएलसीच्या बोर्डाचा राजीनामा देणारे वर्नावीरांची चौकशी प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या सामन्यात सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली. आम्ही त्यांना कोणत्याही कामापासून दूर राहण्याचा आग्रह केला होता आणि त्यांनी ही बाब मान्य केली आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, भ्रष्टाचारविरोधी तपास महिनाभरापासून सुरू आहे.