शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका-इंग्लंड लढत पावसामुळे रद्द

By admin | Updated: June 27, 2016 03:56 IST

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला तिसरा एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

ब्रिस्टल : श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला तिसरा एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यावेळी ४ षटकांत इंग्लंडच्या १ बाद १६ धावा झाल्या होत्या. मालिकेमध्ये इंग्लंड १-०ने आघाडीवर आहे. तत्पुर्वी कौशल मेंडिस, दिनेश चांदीमल आणि कर्णधार अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडला विजयासाठी २४९ धावांचे आव्हान दिले आहे. श्रीलंकेकडून दिनेश चांदीमल याने सर्वाधिक ७७ चेंडूंत ५ चौकारांसह ६२ धावा केल्या. अ‍ॅन्जोलो मॅथ्यूजने ६७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ५६, तर कौशल मेंडिसने ६६ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५३ धावांची खेळी सजवली. उपुल थरंगा याने ३३ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ४० धावांची झटपट खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लिएम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ३४ व ४६ धावा मोजल्या. विले व जॉर्डन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करताना श्रीलंकेला सुरुवातीलाच धावफलकावर ३२ धावा असतानाच दोन धक्के दिले. तथापि, त्यानंतर कौशल मेंडिस आणि दिनेश चांदीमल यांनी १३ षटकांत ५६ धावांची भागीदारी करीत संघाची पडझड थांबवली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २४८.(कौशल मेंडिस ५३, दिनेश चांदीमल ६२, अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज ५६, उपुल थरंगा ४०. ख्रिस वोक्स ३/३४, लिएम प्लंकेट ३/४६, विले १/५५, जॉर्डन १/४९).