श्रीलंकेने केला बांग्लादेशचा ९२ धावांनी पराभव
By Admin | Updated: February 27, 2015 08:31 IST2015-02-26T16:40:07+5:302015-02-27T08:31:18+5:30
क्रिकेट वर्ल्डकपमध्ये गुरुवारी 'अ' गटात खेळल्या गेलेल्या श्रीलंकाविरुध्द बांग्लादेशच्या सामन्यात श्रीलंका संघाने बांग्लादेश संघाचा ९२ धावाने सहज पराभव केला.

श्रीलंकेने केला बांग्लादेशचा ९२ धावांनी पराभव
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २६ - क्रिकेट वर्ल्डकपमध्ये गुरुवारी 'अ' गटात खेळल्या गेलेल्या श्रीलंकाविरुध्द बांग्लादेशच्या सामन्यात श्रीलंका संघाने बांग्लादेश संघाचा ९२ धावाने सहज पराभव केला.
आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करणाच्या निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेला निर्णय अजूक ठरवित सलामीला आलेल्या थ्रीमनी आणि दिलशान या जोडीने संघाला भक्कम सुरुवात करून दिली. थ्रीमनीने सावध खेळी करीत ७८ चेंडूत ५२ धावा केल्या. तर तिलकरत्ने दिलशानने आक्रमक फलंदाजी करीत १४६ चेंडूत नाबाद १६१ धावा केल्या. थ्रीमनी बाद झाल्यानंतर आलेल्या कुमार संगकाराने अवघ्या ७६ चेंडूत नाबाद १०५ धावा काढल्या. यावेळी त्याने १३ चौकार व १ षटकार ठोकला. श्रीलंकेने १ गडी गमावत ३३२ धावा केल्या.
श्रीलंकाने ठेवलेल्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांग्लादेशची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीला आलेला इक्बालला मलिंगाने शून्यावर बोल्ड करीत बांग्लादेशला पहिला धक्का दिला. बांग्लादेशकडून साबीर रहमानने सर्वाधिक ५३ धावा केल्या. शाकीब अल हसन ४६, अनामूल हक २९, सौम्या सरकार २५, मोमिनल हक ०१, महमुददुल्लाह २८, मुशीफिकर रहीम ३६, मुश्रूफ मुर्तूझाने केलेल्या ७, धावांच्या बळावर बांग्लादेश संघाला केवळ २४० धावा करता आल्या. बांग्लादेशचा संघाला ५० षटके खेळता आली नाही त्यांचा संघ ४७ षटकांतच सर्वबाद झाला.