श्रीलंकेने केला झिम्बाब्वेचा सफाया

By Admin | Updated: November 11, 2016 01:02 IST2016-11-11T01:02:59+5:302016-11-11T01:02:59+5:30

कर्णधार रंगना हेराथने झिम्बाब्वेमध्ये एका कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम नोंदविला. हेराथच्या अचूक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने हरारे

Sri Lanka annihilate Zimbabwe | श्रीलंकेने केला झिम्बाब्वेचा सफाया

श्रीलंकेने केला झिम्बाब्वेचा सफाया

हरारे : कर्णधार रंगना हेराथने झिम्बाब्वेमध्ये एका कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम नोंदविला. हेराथच्या अचूक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने हरारे स्पोर्ट््स क्लबमध्ये गुरुवारी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा २५७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत २-० असे वर्चस्व राखले.
श्रीलंकेला अखेरच्या दिवशी विजयासाठी केवळ ३ बळींची गरज होती. हेराथने तासभरापेक्षा कमी वेळेत झिम्बाब्वेचा डावा २३३ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डावखुरा फिरकीपटू हेराथने ६३ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले. झिम्बाब्वेमध्ये कुण्या गोलंदाजाची ही डावातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने १५२ धावांच्या मोबदल्यात १३ बळी घेऊन सर्वोत्तम कामगिरी केली.
हेराथ म्हणाला, ‘‘मी कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. विक्रमाबाबत कधी विचार करीत नाही.’’ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sri Lanka annihilate Zimbabwe