एस़आऱ चंडक हायस्कूलला विजेतेपद शहरस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:26+5:302015-08-16T23:44:26+5:30

सोलापूर:

Sr Chandkal High School championship city level school table tennis tournament | एस़आऱ चंडक हायस्कूलला विजेतेपद शहरस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा

एस़आऱ चंडक हायस्कूलला विजेतेपद शहरस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा

लापूर:
सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित शहरस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत एस़आऱ चंडक हायस्कूलने सर्व वयोगटात निर्विवाद वर्चस्व राखले़ प्रशालेतील १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला़ या संघात हर्ष आसावा, प्रथमेश चिटमिल, पुष्कर लुणावत, कौस्तुभ सोमशे˜ी, सिद्धेश लोहे यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला़ तसेच हर्ष चौधरी, ब्रिजेश भुतडा, निखिल करवा, नयन वेद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला़
तसेच १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला़ या संघात मिताली जाखेटिया, समृद्धी दरक, संस्कृती शिवशरण यांनी द्वितीय क्रमांक पटकावला़ १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले़ या संघात कृष्णा खंडेलवाल, यश कर्णावत, युवराज पवार, विनायक हत्ती यांनी द्वितीय क्रमांक पटकावला़ तसेच मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला़ यात संघात केतकी सुर्डीकर, श्रुती परदेशी, सेजल कोल्हापुरे, श्रेया जाधव, नेहा शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला़
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक धर्मराज क˜ीमनी, आरती काकडे, प्रशिक्षक सिद्रामप्पा मुनोळी यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांचे चेअरमन ओमप्रकाश सोमाणी, सचिव विष्णुकांत मानधनिया, गिरीधारी भुतडा, संजय करवा, संजय डागा, योगेश बियाणी, डॉ़ अर्चना दरक, मुख्याध्यापिका शालिनी सिंघल, पर्यवेक्षिका अंजली चव्हाण यांनी कौतुक केले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
शालेय टेबल टेनिस स्पर्धेत यश मिळविलेल्या एस़आऱचंडक हायस्कूलच्या खेळाडूंसोबत सिद्रामप्पा मुनोळी, शालिनी सिंघल, अंजली चव्हाण, धर्मराज क˜ीमनी़

Web Title: Sr Chandkal High School championship city level school table tennis tournament