शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

भारताच्या सर्वात जलद महिला धावपटूचे मैत्रीणीशी प्रेमसंबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 10:58 AM

भारताची सर्वात जलद महिला धावपटूने शनिवारी धक्कादायक खुलासा केला.

ओडिशा : भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खुलासा केला. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रीणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र, तिने मैत्रीणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे.

द्युतीने 2018च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने देशाला रौप्यपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. द्युतीने 100 मीटर स्पर्धेत २० वर्षांत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. सातव्या क्रमांकाच्या लेनमध्ये धावताना द्युतीने 11.32 सेकंदाची वेळ नोंदवली. 200 मीटर शर्यतीत द्युतीने 23.20 सेकंदांची वेळ नोंदवली. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता. शिवाय 100 मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रमही तिच्याच नावावर आहे. 

सध्या ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करत असून 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचा तिचा निर्धार आहे. ती म्हणाली,''मला समजून घेणारा जीवनसाथी मिळाला आहे. आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायचे आहे, याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवं. समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पाठींबा दिला आहे आणि ही वैयक्तीक निवड आहे. सर्वोच्च न्यायलयानेही 377 कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर शंका उपस्थिक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तीक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. भारतासाठी मी पदक जिंकत राहीन.''  

टॅग्स :Dutee Chandद्युती चंदAsian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा