स्पोर्टपेज: उटांगळे, कोठारी, ज्युबिली, भारत विद्यालय विजयी जिल्हा स्तर १७ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धा
By Admin | Updated: September 13, 2014 23:00 IST2014-09-13T23:00:01+5:302014-09-13T23:00:01+5:30
अकोला : जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलांच्या गटात शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये उटांगळे कॉन्व्हेंट, ज्युबिली स्कूल, भारत विद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट संघाने विजय मिळविला. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित या स्पर्धेला शहरातील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

स्पोर्टपेज: उटांगळे, कोठारी, ज्युबिली, भारत विद्यालय विजयी जिल्हा स्तर १७ वर्षाआतील शालेय क्रिकेट स्पर्धा
अ ोला : जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलांच्या गटात शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये उटांगळे कॉन्व्हेंट, ज्युबिली स्कूल, भारत विद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट संघाने विजय मिळविला. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित या स्पर्धेला शहरातील शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.प्राथमिक फेरीतील पहिला सामना बाबासाहेब उटांगळे व लिटल स्टार स्कूलमध्ये झाला. उटांगळे कॉन्व्हेंटने ३६ धावांनी सामना जिंकला. कोठारी कॉन्व्हेंट व जागृती विद्यालयात झालेल्या सामन्यात कोठारी संघाने प्रथम फलंदाजी करीत ७६ धावा काढल्या. जागृती संघ प्रत्युत्तरात ३५ धावा काढू शकला. कोठारी संघाने ४२ धावांनी सामना जिंकला. इंग्लिश स्कूल व ज्युबिली संघात झालेल्या सामन्यात इंग्लिश स्कूलने ३३ धावा काढल्या. ज्युबिली संघाने ९ गडी राखत ३४ धावा काढून सामना जिंकला. भारत विद्यालय व बाल शिवाजी संघात चुरशीचा सामना झाला. बाल शिवाजी संघाने प्रथम फलंदाजी करीत ३७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारत विद्यालयाने एकही गडी न गमविता ३८ धावा काढून सामन्यावर विजय मिळविला. पाचवा सामना एसओएस व नोएल स्कूलमध्ये झाला. हा सामना एसओएस संघाने जिंकला. सहावा सामना माऊंट कारमेल व जी.एस.कॉन्व्हेंटमध्ये झाला. जीएस संघाने प्रथम फलंदाजी करीत २८ धावा काढल्या. माऊंट कारमेलने प्रत्युत्तरात एकही गडी न गमविता धावा काढून सामना जिंकला. स्पर्धेत पंच म्हणून बंटी गायकवाड, सुमेध डोंगरे, पवन परनाटे, सुनील दांदळे यांनी काम पाहिले. रविवार, १४ सप्टेंबर रोजी स्पर्धेतील उर्वरित सामने घेण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने यांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)...