स्पोर्टपेज: एसओएस, ज्युबिली, शिवाजी संघ विजयी जिल्हा स्तर नेहरू हॉकी स्पर्धा

By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:24+5:302014-09-13T22:59:24+5:30

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर नेहरू हॉकी स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स (एसओएस) हिंगणा रोड, ज्युबिली स्कूल, कुंभारी व शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय संघाने विजय मिळवून विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

Sportspace: SOS, Jubilee, Shivaji team won District Level Nehru hockey tournament | स्पोर्टपेज: एसओएस, ज्युबिली, शिवाजी संघ विजयी जिल्हा स्तर नेहरू हॉकी स्पर्धा

स्पोर्टपेज: एसओएस, ज्युबिली, शिवाजी संघ विजयी जिल्हा स्तर नेहरू हॉकी स्पर्धा

ोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर नेहरू हॉकी स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स (एसओएस) हिंगणा रोड, ज्युबिली स्कूल, कुंभारी व शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय संघाने विजय मिळवून विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेत १५ व १७ वर्षाआतील मुले व मुली सहभागी झाले होते. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातून स्वावलंबी विद्यालय, स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड, हिंदू ज्ञानपीठ, स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला रोड, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय अकोला तसेच ग्रामीण क्षेत्रातून ज्युबिली सीबीएसई कुं भारी शाळेने सहभाग घेतला होता.
१७ वर्षाआतील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात एसओएस हिंगणा संघाने एसओएस बिर्ला संघाला १-० ने पराभूत केले. ग्रामीण क्षेत्रातून ज्युबिली स्कूलला विजयी घोषित करण्यात आले. मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय संघाने एसओएस बिर्ला संघाचा १-० ने पराभव केला. रविवार ,१४ सप्टेंबर रोजी १५ वर्षाआतील मुलांच्या गटातील सामने होणार आहेत. स्पर्धेत पंच म्हणून मयूर निंबाळकर, मयूर चौधरी, धीरज चव्हाण, स्वप्निल अंभोरे, अभिनंदन ठाकूर, राजू उगवेकर, कुणाल सावदेकर यांनी काम पाहिले.
(क्रीडा प्रतिनिधी)
...

Web Title: Sportspace: SOS, Jubilee, Shivaji team won District Level Nehru hockey tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.