क्रीडा : टेनिस
By Admin | Updated: August 23, 2014 22:03 IST2014-08-23T22:03:56+5:302014-08-23T22:03:56+5:30
जांकोविच, रोसोल यांच्यात फायनल

क्रीडा : टेनिस
ज ंकोविच, रोसोल यांच्यात फायनल विन्सटन सलेम : वर्षाची अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा अमेरिकन ओपन टेनिसपूर्वी आयोजित एटीपी विन्सटन सलेम टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये जर्जी जांकोविच आणि लुकास रोसोल किताबासाठी झुंजणार आहे़ झेक प्रजासत्ताकच्या सातवे मानांकन प्राप्त रोसोल याने उपांत्य फेरीच्या सामन्यातील पुरुष एकेरीत तैवानच्या लू येन सूनवर सरळ सेटमध्ये ७-५, ४-६, ६-४ अशा फरकाने मात करीत फायनलमध्ये प्रवेश केला़दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पोलंडच्या जांकोविच याने जबरदस्त कामगिरी करताना अमेरिकेच्या सॅम क्वेरीला ४-६, ७-५, ६-४ अशी धूळ चारत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले़ (वृत्तसंस्था)