क्रीडा संघांनी खेळाडूंची नावे वेळेवर द्यावीत : सोनोवाल

By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:37+5:302014-09-13T22:59:37+5:30

नवी दिल्ली: सर्व क्रीडा संघांना आशियाईसारख्या मोठय़ा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणार्‍या खेळाडूंची नावे आयोजनापूर्वी योग्य वेळेत द्यावीत, जेणेकरून त्यांच्यावर वेळेतच विचारविनिमय करून मंजुरी देता येणे शक्य होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितल़े सोनोवाल म्हणाले, इंचियोन, एशियाडसह कोणत्याही मोठय़ा स्पर्धेमध्ये सवरेत्कृष्ट संघ पाठविण्याचा प्रयत्न असतो़ एशियाडमध्ये अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी आम्हाला एकत्रितरित्या काम करायला हव़े खेळाडूंना मंजुरी देण्यामध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) च्या हस्तक्षेपाबद्दल बोलताना ते म्हणाले, देशामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले होत़े आम्ही आशियाई स्पर्धेमध्ये गतवेळेपेक्षा अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी कटिबद्ध आहोत़

Sports teams should give names of players on time: Sonowal | क्रीडा संघांनी खेळाडूंची नावे वेळेवर द्यावीत : सोनोवाल

क्रीडा संघांनी खेळाडूंची नावे वेळेवर द्यावीत : सोनोवाल

ी दिल्ली: सर्व क्रीडा संघांना आशियाईसारख्या मोठय़ा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणार्‍या खेळाडूंची नावे आयोजनापूर्वी योग्य वेळेत द्यावीत, जेणेकरून त्यांच्यावर वेळेतच विचारविनिमय करून मंजुरी देता येणे शक्य होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितल़े सोनोवाल म्हणाले, इंचियोन, एशियाडसह कोणत्याही मोठय़ा स्पर्धेमध्ये सवरेत्कृष्ट संघ पाठविण्याचा प्रयत्न असतो़ एशियाडमध्ये अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी आम्हाला एकत्रितरित्या काम करायला हव़े खेळाडूंना मंजुरी देण्यामध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) च्या हस्तक्षेपाबद्दल बोलताना ते म्हणाले, देशामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने असे करण्यात आले होत़े आम्ही आशियाई स्पर्धेमध्ये गतवेळेपेक्षा अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी कटिबद्ध आहोत़

Web Title: Sports teams should give names of players on time: Sonowal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.