क्रीडा : संधू
By Admin | Updated: August 21, 2014 19:33 IST2014-08-21T19:33:15+5:302014-08-21T19:33:15+5:30
ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवीन-संधू

क्रीडा : संधू
ऑ िम्पिकसाठी पात्रता मिळवीन-संधूनवी दिल्ली : आगामी आशियाई स्पर्धेत देशासाठी पदक आणि विश्व चॅम्पियनशिपद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे़ यात नक्कीच यशस्वी होईन, असा विश्वास आघाडीचा भारतीय नेमबाज मानवजित सिंह संधू याने व्यक्त केला आहे़ संधू म्हणाला, सध्या आशियाई स्पर्धेत देशासाठी पदक मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे़ त्यासाठी विशेष मेहनत घेत आहे़ त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये होणार्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून ऑलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे़संधूने ग्लास्गो येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ट्रॅप स्पर्धेत कास्यपदकावर नाव कोरले होते़ तो पुढे म्हणाला, ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक नेमबाजी प्रकाराचा समावेश नव्हता़ त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीवर परिणाम झाला; मात्र स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी आहे़ आगामी आशियाई स्पर्धेत नेमबाजी स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे़ भारतीय खेळाडू १५ सप्टेंबरपर्यंत इंचियोन येथे पोहोचणार आहेत़ विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेला १९ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे़ नेमबाजी विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा स्पेनमध्ये २० सप्टेंबरपासून सुरू होईल़