क्रीडा रणजी कर्नाटक
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:35+5:302015-02-20T01:10:35+5:30
समर्थची शतकी खेळी

क्रीडा रणजी कर्नाटक
स र्थची शतकी खेळीकर्नाटकचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चितइंदूर : रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चौथ्या दिवसअखेर कर्नाटकने आसामपुढे विजयासाठी ६८३ धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे करीत उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे. तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १३७ धावांची मजल मारणाऱ्या कर्नाटक संघाने गुरुवारी चौथ्या दिवशी दुसरा डाव ५ बाद ४१५ धावसंख्येवर घोषित केला. कर्नाटकच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रविकुमार समर्थ (१७८) व रॉबिन उथप्पा (७७) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. कर्नाटकने आसामपुढे विजयासाठी ६८३ धावांचे आव्हान ठेवले. शुक्रवारी सामन्याचा अखेरचा दिवस आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आसामने आज चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी बिनबाद ३२ धावांची मजल मारली होती. त्यांना विजयासाठी अद्याप ६५१ धावांची गरज आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी २५ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या पल्लव कुमार याला कर्णधार धीरज जाधव (७) साथ देत होता. (वृत्तसंस्था)