स्पोर्टस् फोटोग्राफीच झाले आयुष्य

By Admin | Updated: August 12, 2016 00:50 IST2016-08-12T00:50:01+5:302016-08-12T00:50:01+5:30

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आवड म्हणून सुरू झालेल्या फोटोग्राफीचा प्रवास खेळाच्या मैदानापर्यंत आला. खेळातील महत्त्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण

Sports photography is life | स्पोर्टस् फोटोग्राफीच झाले आयुष्य

स्पोर्टस् फोटोग्राफीच झाले आयुष्य

रिओ : दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आवड म्हणून सुरू झालेल्या फोटोग्राफीचा प्रवास खेळाच्या मैदानापर्यंत आला. खेळातील महत्त्वाचे क्षण टिपताना खेळाडूंच्या भावमुद्राही टिपून वेगळेपण सिध्द करणारी एक ५७ वर्षीय महिला आॅलिम्पिकच्या मैदानावरचं नाट्य टिपत आहे. सोमवारी पहाटेपासूनच पाऊस सुरू होता. जीतु रायची महत्त्वाची स्पर्धा पाहण्यासाठी बसने जात होतो. यावेळी कॅमेऱ्याची मोठी ब्रिफकेस, स्टॅँड असा सर्व लवाजमा असलेली एक महिला दिसली. तिला थोडी बॅग उचलण्यासाठी मदत करून बसायला जागा दिल्यानंतर बोलायला सुरुवात झाली अन् दक्षिण अफ्रिकेच्या अ‍ॅना लॉर्इंग यांचा सगळा प्रवास उलगडत गेला. ५७ व्या वर्षीही तरुणांना लाजेल अशा उत्साहात मैदानावर वावरण्यामागची जिद्द त्यांनी सांगितली.
अ‍ॅना म्हणाल्या, ‘‘दक्षिण आफ्रिकेतील पिचेरीया गावात मी राहात होते. आमच्या गावात शहरातील एका शाळेची सहल आली होती. त्या मुलांकडे मी कॅमेरा पाहिला आणि मला मोठे कुतुहल वाटले, याच्या साहाय्याने फोटो काढले जातात. त्यामुळे मला सुध्दा लहानपणापासून फोटोग्राफीचा छंद होता. जसजशी मोठी होते गेले तसतशी माझी आवड वाढत गेली. साधा कॅमेरा घेऊन जंगलात फोटो काढायला जाऊ लागले. शिक्षणासाठी भावाकडे येऊन केपटाऊनमध्ये विधी शाखेत प्रवेश घेऊन अभ्यास सुरू केला. यावेळी उदारनिर्वाहासाठी केप टाइम्स वृत्तपत्र विकत होते. त्यातील फोटो दररोज पाहायचे आणि आपणही फोटोग्राफी करावी असे वाटू लागले. यासाठी एक कॅमेरा घेतला आणि क्रिकेट, रग्बी, फुटबॉल मैदानावर भटकू लागले. एके दिवशी केप टाइम्सचा फोटोग्राफर आजारी पडला. मी मैदानावर जाऊन फोटो काढले आणि सरळ आॅफिसला जाऊन दिले. संपादकांनी ते पाहिले आणि थक्कच झाले. येथूनच माझ्या फोटोग्राफीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ’’ (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Sports photography is life