क्रीडा लोकल स्पेशल

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:11+5:302015-02-13T23:11:11+5:30

अंजुमनची विजयी सलामी

Sports Local Special | क्रीडा लोकल स्पेशल

क्रीडा लोकल स्पेशल

जुमनची विजयी सलामी
नागपूर : अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाने केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १०-० ने धुव्वा उडवत अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित इंजिनिअर्स कप-२०१५ फुटसल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
महाविद्यालयाच्या परिसरात शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन अंजुमन महाविद्यालचे प्राचार्य साजिद अन्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. एस.एम. खातिब, प्रा. झाकिर खान, प्रा. मोहम्मद अझीज आदी उपस्थित होते.
दरम्यान, क्रिकेटमध्ये अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ४ गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या तुळशीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा डाव ८२ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. अन्य लढतीत जेडी अभियांत्रिकी महाविद्यालयाने एस.बी. जैन इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाचा ७ गड्यांनी पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sports Local Special