स्पोर्ट: स्कूल ऑफ स्कॉलर्सची विजयी सलामी जिल्हा स्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन

By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:41+5:302014-08-21T21:45:41+5:30

अकोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोला जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष आर.बी.ठाकूर यांच्या हस्ते गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी झाले. उद्घाटनीय सामना स्कूल ऑफ स्कॉलर्स व नोएल संघात होऊन ४-० ने स्कूल ऑफ स्कॉलर्स संघाने सामना जिंकून, स्पर्धेला विजयी सलामी दिली.

Sports: Inauguration of the School of Scholars' winner Salary District Level School Hockey | स्पोर्ट: स्कूल ऑफ स्कॉलर्सची विजयी सलामी जिल्हा स्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन

स्पोर्ट: स्कूल ऑफ स्कॉलर्सची विजयी सलामी जिल्हा स्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन

ोला : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोला जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने आयोजित जिल्हा स्तर शालेय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष आर.बी.ठाकूर यांच्या हस्ते गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी झाले. उद्घाटनीय सामना स्कूल ऑफ स्कॉलर्स व नोएल संघात होऊन ४-० ने स्कूल ऑफ स्कॉलर्स संघाने सामना जिंकून, स्पर्धेला विजयी सलामी दिली.
याप्रसंगी राखीव पोलिस निरीक्षक ए.बी.नागपूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलिस विभागातील ज्येष्ठ हॉकीपटू शेख इकबाल, राजेंद्र चव्हाण, पोलिस क्रीडा विभागप्रमुख राजू शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत पंच म्हणून मयूर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे, धीरज चव्हाण, अप्पू ठाकूर, राजू उगवेकर, गोपाल निंबाळकर, शुभम अढावू, पप्पू साठे यांनी काम पाहिले. त्यांना निशांत वानखडे, राजू उगवेकर, प्रशांत खापरकर, राहुल जंगम यांनी सहकार्य केले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने होते. (क्रीडा प्रतिनिधी)
बॉक्स
असे रंगले सामने
मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या १४ वर्षाआतील मुलांच्या गटातील सामन्यात स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड संघाने नोएल कॉन्व्हेंटवर विजय मिळविला. दुसर्‍या सामन्यात स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला संघावर हिंदू ज्ञानपीठ संघाने ०-२ अशी मात केली. तिसर्‍या सामन्यात नोएल स्कूलने माऊंट कारमेलचा १-० ने पराभव केला.
उपान्त्यफेरीच्या पहिल्या सामन्यात स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा शाखेवर हिंदू ज्ञानपीठने ०-१ विजय मिळविला. दुसरा सामना जीएस कॉन्व्हेंट व नोएल स्कूलमध्ये सुरू झाला. मात्र, पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबविण्यात आला. हा सामना उद्या शुक्रवार, २२ ऑगस्टला खेळविण्यात येईल.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात जीएस कॉन्व्हेंट विजयी तर एसओएस हिंगणा उपविजयी ठरला. ग्रामीण क्षेत्रात मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात एमराल्ड स्कूलला प्रभात किडसने पराभूत केले.
फोटोकॅप्शन: एसओएस व नोएल संघातील सामन्यातील क्षण.
-२२सीटीसीएल५३
...

Web Title: Sports: Inauguration of the School of Scholars' winner Salary District Level School Hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.