क्रीडा : डिव्हिलियर्स
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:51+5:302015-02-14T23:50:51+5:30
वर्ल्डकपसाठी सज्ज -डिव्हिलियर्स

क्रीडा : डिव्हिलियर्स
व ्ल्डकपसाठी सज्ज -डिव्हिलियर्स हॅमिल्टन : वर्ल्डकपमध्ये आम्ही कोणत्याही संघाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबि़ डिव्हिलियर्स याने व्यक्त केले आहे़ वर्ल्डकपमध्ये रविवारी होणार्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे़ गत चार वर्ल्डकपमध्ये आफ्रिके ला विजेतेपदाचा दावेदार मानले जात होते़ मात्र, हा संघ ऐनवेळी नांगी टाकतो़ त्यामुळे या संघाला चोकर्स असे म्हटले जाते़डिव्हिलियर्स म्हणाला की, आमच्यावर लागलेला चोकर्सचा डाग मिटविण्यासाठी यावेळी वर्ल्डकप जिंकावाच लागणार आहे़ आम्ही आता वर्ल्डकपसाठी पूर्णपणे सज्ज आहोत़ भूतकाळात काय झाले त्याचे आम्हाला देणे-घेणे नाही़ मात्र, यावेळी आम्ही नक्कीच नवा इतिहास घडविण्यासाठी मैदानावर उतरू़