क्रीडा : चिगुंबुरा

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:09+5:302015-02-14T23:52:09+5:30

आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट खेळ करू : एल्टोन हॅमिल्टन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी होणार्‍या वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीत आम्ही शंभर टक्के योगदान ...

Sports: Chigumbura | क्रीडा : चिगुंबुरा

क्रीडा : चिगुंबुरा

>आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट खेळ करू : एल्टोन
हॅमिल्टन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी होणार्‍या वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीत आम्ही शंभर टक्के योगदान देऊ, असे मत झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टोन चिगुंबुरा याने व्यक्त केले आहे़
२८ वर्षीय कर्णधार म्हणाला की, पावसाचा अडथळा आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत आमचे चांगले प्रदर्शन राहिले होते, तर श्रीलंकेला आम्ही धूळ चारली होती़ त्यामुळे संघातील खेळाडूंना आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करू .
न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सराव सामन्यांत सरस कामगिरी झाल्यामुळे संघात नवचैतन्य निर्माण झाले आहे़ वर्ल्डकपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत आम्ही आता बलाढ्य संघांना धूळ चारण्यास सज्ज आहोत, असा विश्वास एल्टोन याने व्यक्त केला आहे़
(वृत्तसंस्था)
०००००

Web Title: Sports: Chigumbura